'इतक्या' कंत्राटी आरोग्यसेविका सेवेत होणार कायम

करोनाकाळात केले होते काम
'इतक्या' कंत्राटी आरोग्यसेविका सेवेत होणार कायम

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

करोना( Corona ) संसर्गाच्या कालावधीत कंत्राटी( Contratcual Basis ) स्वरुपात विविध विभागांमध्ये भरती करण्यात आलेल्या 597 आरोग्यसेविकांना( Health Workers ) कायमस्वरुपी म्हणून कामावर रुजू करण्याचा निर्णय राज्याच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. यामुळे करोनात निरंतर रुग्णसेवा देणार्‍या कंत्राटी आरोग्यसेविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय बुधवारी जारी करण्यात आला.

कंत्राटी स्वरुपात भरती करण्यात आलेल्या या आरोग्यसेविकांचे 11 महिन्यांचे कंत्राट होते. राज्यात करोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर त्यांचे कंत्राट पुढे सुरू ठेवण्यात आले नाही. त्यामुळे उपासमारीचे संकट ओढवलेल्या आरोग्यसेविकांनी आरोग्यसेवेत कायमस्वरुपी म्हणून दाखल करून घेण्याची मागणी केली होती.

राज्यात सत्तेत आलेल्या शिंदे सरकारने आरोग्यसेविकांची मागणी लक्षात घेऊन 597 आरोग्यसेविकांना कायमस्वरुपी शासन सेवेत घेण्याचा निर्णय घेतला. या आरोग्यसेविकांना उपसंचालक, आरोग्यसेवा परिमंडळे यांनी त्यांचे मंडळातील एनयूएचएम, आरबीएसके, आदिवासी, बिगर आदिवासी, नक्षलग्रस्त व अर्बन आरसीएच कार्यक्रमाअंतर्गत रिक्त पदांवर नेमणुका द्यावात, असे शासन निर्णयात म्हटले आहे.

आरोग्यसेविकांना नेमणुका देताना त्यांची सेवाज्येष्ठता यादी तयार करावी. त्यानुसार समुपदेशाने रिक्त पदावर समायोजन करावे. एकाच दिवशी सेवेत रुजू झालेल्या आरोग्य सेविकांची सेवाज्येष्ठता ठरवताना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेचे शेवटच्या वर्षाचे गुण बघून जास्त गुण असणार्‍यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे, असे निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com