नागोबा आला बिळातून बाहेर; जिल्ह्यात वाढले सर्पदंशाचे रुग्ण

नागोबा आला बिळातून बाहेर; जिल्ह्यात वाढले सर्पदंशाचे रुग्ण

नाशिक | वैभव कातकाडे | Nashik

पावसाळा सुरू झाल्यानंतर पावसाचे (Rain) पाणी सापांनी (Snake) तयार केलेल्या बिळांमध्ये शिरते. परिणामी साप (Snake) आणि नाग (Cobra) बाहेर पडून अन्न (Food) शोधत असतात...

त्यामुळे सर्पदंशाचे (Snakebite) प्रकार बघायला मिळतात. जिल्हा रुग्णालयात (Civil Hospital) आलेल्या रुग्णांपैकी अनेकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या सहा महिन्यांचा विचार करता एकूण ३२२ सर्पदंशाचे रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे जून म्हणजेच पावसाळयात दखल झाल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावण्याने नदी, नाले वाहू लागले असताना जमिनीमध्ये देखील पाणी मुरत आहे. त्यामुळे बिळांमध्ये पाणी शिरल्याने अडगळीच्या विसाव्याला असलेले साप बिळाबाहेर पडत आहेत. त्यामुळे सर्पमित्रांना (Snake Charmer) पकडण्यासाठी बोलविण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे.

सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच घरगुती उपचार न करता तत्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात (Civil Hospital) दाखल व्हावे. घरगुती उपचार करू नये, शेतातील कामे करताना किंवा रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना बॅटरीचा वापर करावा; तसेच साप दिसल्यास सर्पमित्राशी संपर्क साधावा, असे आवाहन सर्पमित्रांकडून केले जात आहे.

सर्पदंश झाल्यावर तातडीचा उपचार

सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच अनेकजण घाबरून जातात, त्यामुळे प्रकृती अधिक बिघडते. सर्वप्रथम रुग्णाला जवळ्याच्या प्राथमिक रुग्णालयात दाखल करावे. घराच्या घरी उपचार करू नये, जखम जंतुनाशक औषधाने धुवावी.

'या' तालुक्यात सर्पदंशच्या सर्वाधिक घटना

जिल्ह्यातील डोंगराळ आणि आदिवासी पट्टा असलेल्या त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी तालुक्यात सर्पदंशच्या सर्वाधिक घटना घडतात, अशी माहिती जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या आकडेवारी चरून दिसून येत आहे.

औषधसाठा उपलब्ध

सर्पदंशावरील औषधसाठा उपलब्ध जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालये तसेच जिल्हा रुग्णालयात सर्पदशावरील औषध साठा उपलब्ध आहे. सर्प देश झालेल्या रुग्णावर तत्काळ उपचार करण्यात येतात, असे जिल्हा रुग्णालयाकडून सांगण्यात आले.

सर्पदंशांबाबत असलेले अज्ञान आणि घबरुन दश झाल्यानंतर अनेकजण तेथे करकचून बांधून ठेवतात, हे चुकीचे आहे. असा प्रकार लक्षात पाणी किंवा अन्नपदार्थ सेवन करणे टाळावे. तसेच तातडीने प्राथमिक रुग्णालयात दाखल होऊन उपचार घ्यावेत.

- एम. व्ही. जाधव इन्चार्ज, इमर्जन्सी विभाग, जिल्हा रुग्णालय.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com