नांदेड लोकमान्य टिळक एक्सप्रेसच्या चाकातून अचानक धूर; प्रवाशांची तारांबळ

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक | Nashik

जिल्ह्यातील उगाव रेल्वे स्थानकाजवळ (Ugav Railway Station) नाशिक येथून मनमाडच्या (Manmad) दिशेने धावणाऱ्या नांदेड लोकमान्य टिळक एक्सप्रेसच्या एका डब्यातील चाकातून धूर (Smoke) निघाल्याने प्रवाशांचा चांगलाच गोंधळ उडाला…

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेवरील नाशिकहून मनमाडच्या दिशेने निघालेल्या नांदेड लोकमान्य टिळक एक्सप्रेसच्या एका डब्याच्या भागातून सकाळी १० वाजेच्या सुमारास धूर निघाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. त्यानंतर उगाव रेल्वे स्थानकावर गाडी थांबविण्यात आली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

निवडणूक आयोगाच्या नेमणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

यानंतर एक्सप्रेसच्या चालकाने खाली उतरून बघितले असता चाकाला (wheel) प्लास्टिकचा ब्रेक चिटकल्याने धूर निघत असल्याचे लक्षात आले. त्यावेळी तात्काळ अग्निप्रतिरोधक यंत्रणा कार्यान्वित करून अग्निरोधक पावडर सोडून धूर आटोक्यात आणला. यानंतर ब्रेक दुरुस्त करून एक्सप्रेस मनमाडच्या दिशेने रवाना झाली.

Pune Bypoll Election Results 2023 : कसब्यात भाजपला धोबीपछाड, धंगेकर तब्बल ११ हजार मतांनी विजयी

दरम्यान, या घटनेमुळे मनमाड-मुंबई गोदावरी एक्सप्रेस (Manmad-Mumbai Godavari Express) उगाव रेल्वे स्थानकात थांबविण्यात आल्याने एक्सप्रेस चाकरमान्यांचे कामावर वेळेत न पोहचल्याने हाल झाल्याचे पाहायला मिळाले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *