Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यास्मार्ट सिटी घेणार शासनाचे मार्गदर्शन

स्मार्ट सिटी घेणार शासनाचे मार्गदर्शन

नाशिक । फारूख पठाण Nashik

नाशिक महापालिकेच्या ( NMC ) 200 कोटी रुपये पैकी व्याजापोटी कंपनी सुमारे 33 कोटी रुपये महापालिकेला परत करणार होती. याबाबतचा निर्णय नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता, मात्र महापालिकेला पैसे देण्यावरून स्मार्ट सिटीने ( Smart City Company )पुन्हा दिरंगाई केल्याचे दिसून येत असून स्मार्ट सिटी कंपनी आता पैसे देण्यासाठी शासनाकडून मार्गदर्शन मागणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे महापालिकेला हक्काचे पैशांसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

- Advertisement -

केंद्रातील मोदी सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या स्मार्ट सिटीच्या यादीमध्ये दुसर्‍या फेरीत अर्थात 2016 मध्ये नाशिकचे नाव आले. यानंतर नाशिकच्या झपाट्याने विकास होणार व नाशिक खर्‍या अर्थाने स्मार्ट होणार असे नागरिकांना वाटत होते, मात्र मुळात असे झाले नाही. यामुळे लोकप्रतिनिधींसह नागरिकांमध्ये सध्या तरी स्मार्ट सिटीबद्दल प्रचंड नाराजीचे सूर दिसत आहे.

केंद्र सरकाराच्या या उपक्रमांमध्ये नाशिक महापालिकेच्या 250 कोटींपैकी 200 कोटी रुपये रक्कम हे अदा करण्यात आली होती, मात्र विकास कामासाठी ती पुन्हा शंभर कोटी महापालिकेला मिळावे असा ठराव महासभेत करण्यात आलेला आहे. मात्र 100 कोटी रुपये परत करता येणार नाही तरी दोनशे कोटीच्या व्याजापोटी सुमारे 33 कोटी रुपये महापालिकेला देण्यात येईल, असे आश्वासन स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने देण्यात आले होते.

नाशिकमध्ये झालेल्या स्मार्ट सिटीचे अध्यक्ष तथा राज्याचे सचिव लिमये यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र त्याला सुमारे दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी महापालिकेला पैसे मिळाले नाही. याबाबत स्मार्ट सिटीच्या अधिकार्‍यांशी चर्चा केल्यावर महापालिकेने त्यांच्या वाट्यातील शंभर टक्के रक्कम दिलेली नाही. यामुळे व्याजापोटीची रक्कम त्यांना द्यायची की उर्वरित रक्कम यापैकी ती रकम वजा करायची यासाठी शासनाकडे आम्ही मार्गदर्शन मागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या