स्मार्ट सिटी आपले काम ठेवणार नाशिककरांसमोर

स्मार्ट रोड
स्मार्ट रोड

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहराचा (nashik city) विकास (Development) होण्यासाठी नाशिकची स्मार्ट सिटी (Smart City) योजनेत समावेश करण्यात आला आहे. परंतु स्मार्ट सिटीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांमुळे शहरातील रस्त्यांची दुरावस्था (poor condition of roads) झाली आहे.

त्याचबरोबर स्मार्ट सिटीच्या (Smart City) माध्यमातून एकही ठोस काम करण्यात आल्याचे दिसत नसल्याने स्मार्ट सिटीबाबत कायमच नाराजी व्यक्त केली जात असते. परंतु आता स्मार्ट सिटीच्या वतीने किती व कोणती कामे करण्यात आली, याचा अहवाल तयार करून तो नाशिककरांसमोर (nashikkar) मांडण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.

नाशिक महानगर पालिकेची (Nashik Municipal Corporation) स्मार्ट सिटीत निवड होण्यासाठी तत्कालिन सत्ताधारी भाजपाने (BJP) अनेक प्रयत्न केले. स्मार्ट सिटी योजनेत नाशिकचा (nashik) समावेश झाल्याने शहराचा विकास (Development) होवून शहरात अनेक नवनवीन प्रकल्प उभे राहतील असे सर्वांनाच वाटले होते. परंतु प्रत्यक्षात स्मार्ट सिटीच्यावतीने शहरातील रस्ते खोदणे व ते दुरस्त करणे (road repair) याशिवाय कोणतेही ठोस काम झालेले दिसत नाही.

सिंहस्थ कुंभमेळा (Simhastha Kumbh Mela) तोंडावर आलेला असतांना स्मार्ट सिटीकडून गोदावरीच्या (godavari river) सौदर्यात भर टाकणारे एकही काम झालेले नाही. स्मार्ट सिटीने शहराचा विकास करण्याऐवजी शहरातील अनेक रस्त्याची खराबी केल्याचा आरोप हा राजकीय पक्षांबरोबर (political parties) नागरिकाकडूनही केला जात आहे. त्यातच आता स्मार्ट सिटीची मुदत जून महिन्यांत संपत असल्याने सुरु असलेली कामे पुर्ण करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com