स्मार्ट सिटीने मनपाला निधी परत द्यावा; ‘मविआ’ घेणार पुढाकार

jalgaon-digital
3 Min Read

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

केंद्र सरकारच्या (central goverment) स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये (Smart City Project) केंद्रासह राज्य शासन (State government) तसेच नाशिक महापालिकेचा (Nashik Municipal Corporation) वाटा आहे. नाशिक महापालिकेच्या अडीचशे कोटींपैकी 200 कोटी रुपये स्मार्ट सिटी कंपनीला (Smart City Company) यापूर्वीच देण्यात आलेले आहेत.

मात्र कामाची गती पाहिल्यावर निधी (fund) खर्च झालेला नसल्यामुळे यापैकी शंभर कोटी रुपये नाशिक महापालिका परत मिळावे, अशी मागणी लोकप्रतिनिधी यांनी केली होती. तर रक्कम परत न देता त्यापोटी व्याजाची रक्कम महापालिकेला मिळणार, असे स्मार्ट सिटीने (Smart City) कबूल केले होते.

मात्र महापालिकेकडून संपूर्ण रक्कम मिळालेली नसल्यामुळे व्याजाची रक्कम देता येईल का? याबाबत स्मार्ट सिटी कंपनीने शासनाकडे मार्गदर्शन मागविले होते.त्यामुळे आता महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) स्थानिक नेते स्मार्ट सिटीकडून 33 कोटी रुपये महापालिकेला मिळावे, यासाठी पाठपुरावा करणार आहे.

स्मार्ट सिटीकडून (smart city) सुमारे दोन महिन्यांपूर्वी शासनाला पत्र पाठवून याबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. मात्र अद्याप शासनाकडून त्याचे उत्तर मिळालेले नसल्याची माहिती अधिकार्‍यांकडून मिळाली आहे. यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असताना हक्काचे व्याजाचे पैसे वेळेवर मिळाले नाही तर त्याचा काय उपयोग? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

यामुळे शिवसेना नेते तथा महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते (Shiv Sena leader and former Municipal Corporation Opposition Leader Ajay Boraste) तसेच काँग्रेसचे माजी गटनेते नगरसेवक शाहू खैरे (Shahu Khaire) आदी महाविकास आघाडीचे नेते शासनाकडे पाठपुरावा करून व्याजाची रक्कम महापालिकेला मिळावी, यासाठी प्रयत्न करणार आहे. नाशिक महापालिकेचे पैसे स्मार्ट सिटीकडे पडून आहे. यामुळे शहरातील विकास कामांसाठी शंभर कोटी रुपये स्मार्ट सिटीने परत महापालिकेला द्यावे,अशी मागणी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून करण्यात आली होती.

तर महापौर सतीश कुलकर्णी असतांना महासभेत याबाबतचा प्रस्ताव देखील पारित करण्यात आला होता. मात्र स्मार्ट सिटीने फक्त व्याजापोटीची रक्कम देण्याचे कबूल केले होते. स्मार्ट सिटीचे अध्यक्ष तथा राज्याचे सचिव लिमये यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक मध्ये झालेल्या आढावा बैठकीत नाशिक महापालिकेला व्याजापोटी सुमारे 33 कोटी रुपये देण्याचे ठरले होते. ती रक्कम 31 मार्चपर्यंत महापालिकेला मिळणे अपेक्षित होते. मात्र अद्याप नाशिक महापालिकेला स्मार्ट सिटी कंपनीकडून व्याजापोटीची सुमारे 33 कोटी रुपयांची रक्कम अदा झालेले नाही. यामुळे नाशिक महापालिकेच्या विकासकामांना अडथळा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्री, नगर विकास मंत्री तसेच पालकमंत्री यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करण्यात येईल. नाशिककरांचे हे हक्काचे पैसे असून मोठ्या प्रमाणात रक्कम स्मार्ट सिटी कंपनीकडे पडून आहे. कमीत कमी व्याजापोटीची रक्कम महापालिका मिळाली तर शहराच्या विकासात त्याचा उपयोग करता येईल, म्हणून लवकरच याबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार व स्मार्ट सिटी कडील रक्कम महापालिकेला मिळून देण्यासाठी प्रयत्न करणार.

– अजय बोरस्ते, माजी विरोधी पक्ष नेते मनपा, नाशिक

स्मार्ट सिटी कंपनीने नाशिक शहराचा सत्यानाश केला आहे, सर्व प्रकारे निकृष्ट दर्जाचे काम केले आहे. त्यांचा भोंगळ कारभार बघता आपले पैसे आपल्याला मिळावे व महापालिकेच्या माध्यमातून शहराच्या विकास व्हावा असेच सांगता येईल. त्यांनी व्याजापोटीची रक्कम महापालिकाला देण्याचे कबूल केले होते. तरीही दिले नाही. आम्ही महाविकास आघाडीचे नेते शासनाकडे पाठपुरावा करून हे पैसे महापालिकेला मिळून देऊ.

– शाहू खैरे, काँग्रेस माजी गटनेता, मनपा नाशिक

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *