लघु उद्योग दिन विशेष : हजारो लघुउद्योग मुख्य प्रवाहात येण्यासाठी सज्ज

पायाभूत सुविधा, माफक दरात जागा हवी
लघु उद्योग दिन विशेष :  हजारो लघुउद्योग मुख्य प्रवाहात येण्यासाठी सज्ज
USER

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आज 30 ऑगस्ट लघु उद्योग दिन ( Small Industry Day ). बेरोजगारांना नव्या उद्योगासाठी प्रेरीत करणे, उद्योग विकासाचे धडे ( Industry Development ) देत आत्मनिर्भर बनवणे याउद्येशाने लघुउद्योग दिन दरवर्षी साजरी केला जातो. स्मार्ट सिटीकडे ( Nashik- Smart City )वाटचाल करणार्‍या नाशिक शहरात विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केली जात आहे.

आयटी क्षेत्रापासून गृहउद्योगापर्यंत आणि शेतीपासून प्रक्रिया उद्योगापर्यंत सर्वच क्षेत्रात चांगले काम आहे. त्यामुळे सद्यस्थितील हजारो उद्योग मुख्य प्रवाहात येण्यासाठी सज्ज असून त्यांना केवळ पायाभूत सुविधा आणि माफक दरात हवी आहे, ती केवळ जागा.

आज नाशिक शहरात 300 पेक्षा अधिक लहानमोठ्या केवळ आयटी कंपन्या काम करत आहेत. इतर लहानमोठे उद्योग पकडले, तर ही संख्या हजारोच्या वरती जाईल. घरोघरी लहानमोठं काम करून उदरनिर्वाह केला जात असल्याचे बघायला मिळते. कंपन्यांचे कार्यक्षेत्र मर्यादित असले तरीही या कंपन्यांना पायाभूत सुविधा, कौशल्यपूर्ण मनुष्यबळ तसेच प्रशिक्षणावर आधारित शिक्षण मिळाले तर या कंपन्या कुठल्या कुठे पोहोचतील यात शंका नाही.

करोनामुळे वर्क फ्रॉम होम कल्चरने आपली पाळेमुळे घट्ट केली आहेत. त्यामुळे वर्क कल्चर बदलले असले तरीदेखील दिवसागणिक प्रगती मात्र थांबली नाही, त्यामुळे जी परिस्थिती असेल ती स्वीकारून अनेकांनी नव्या उद्योगासाठी पुढे येत अनेक पर्याय खुले केले आहेत. नाशिक शहरात क्वॉलिटी ऑफ लाईफ उत्तम आहे.

पर्यटनाच्या मोठ्या संधी शहरात आहेत. शहराच्या कानाकोपर्‍यातून अवघ्या काही मिनिटांत घरापर्यंत पोहोचणेही शक्य आहे. त्यामुळे बड्या शहरांपेक्षा मध्यम शहर असलेल्या नाशिकमध्ये अनेकजन आले की कायमचेच स्थायिक होण्याचा विचार करतात. यामुळे उद्योगाची व्याप्ती वाढते परिणामी रोजगार वृद्धी होण्यात मदत होते. करोनामुळे अनेक उद्योग बंद झाले पण शहरात लहानमोठ्या आयटी क्षेत्रात काम करणार्‍या कंपन्या तग धरून आहेत.

अनेक कंपन्या छोटेखानी बसून अमेरिका, युरोपसारख्या क्लायंटला सर्व्हिस देत आहेत. नाशिकच्या आयटी क्षेत्राने स्टार्टअप, प्रॉडक्ट आणि प्रोग्रामिंगमध्ये उत्तम कामगिरी बजावली आहे. कंपन्यांना कायद्याबद्दल जनजागृती करण्याची गरज आहे. आयटी हब साकारण्यासाठी शासनाने हक्काची जागा उपलब्ध करून दिली पाहिजे. आयटी हब होण्यासाठी जमिनींच्या किमती कमी केल्या पाहिजेत. शासनाचे प्रशिक्षित मनुष्यबळासाठी योजना आखायला हवी यातून चांगला बुस्ट या लहान कंपंन्यांना मिळण्यास मदत होईल.

लहान कंपन्यांची व्याप्ती वाढावी

लहान कंपन्यांची संख्या वाढली पाहिजे. राज्य सरकारने अशा कंपन्यांना माफक दरात जागा उपलब्ध करून दिली पाहिजे. अतिसुक्ष्म कंपन्यांनी लहान कंपन्यांकडे वाटचाल करावी. लहान कंपन्यांनी मध्यम उद्योगाकडे वाटचाल करावी तर मध्यम उद्योगांनी मोठ्या उद्योगाकडे वाटचाल केली पाहिजे. तेव्हा लहान कंपन्यांची व्याप्ती वाढेल परिणाम रोजगार वाढतील.

सुधीर मुतालिक, अध्यक्ष, सीआयआय महाराष्ट्र

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com