शिरपूर (प्रतिनिधी)

तालुक्यातील नवी अंतुर्ली शिवारात एका सहा वर्षीय बालकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुले गावात एकच खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच तालुका व जिल्ह्यातील तपास यंत्रणा बुधवारी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी दाखल झाल्या आहेतमोहित दिनेश ईशी (वय ६ रा.अंतुर्ली) असे हत्या झालेल्या बालकाचे नाव आहे.मोहित हा गावातील एका शेतात मजुरीसाठी गेलेल्या आई सोबत गेला होता दुपारी खेळत असताना अचानक गायब असल्याचे त्याच्या आई ज्योती हिच्या लक्षात येताच शोधाशोध सुरू केले परंतु तो मिळून आला नाही.सायंकाळी उशिरा एका शेतात तो मृतावस्थेत आढळून आला.अज्ञात इसमाकडून दगडाने ठेचून मारल्याचे निदर्शनात आल्याची वार्ता गाव परिसरात वाऱ्यासारखी पसरली.

आई शेतात निंदणी करतांना झाली हत्या

अंतुर्ली येथीलयेथील दिनेश शिवाजी ईशी व सौ.ज्योती दिनेश ईशी यांचा तो मुलगा आहे. हे कुटुंब गावात मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात.कोरोनामुळे शाळा बंद असल्याने त्याला घरी एकटे सोडण्याएवजी आई शेतात सोबत घेऊन गेली होती मुलाला बांधावर बसवून शेतात निंदनी करत होती. मुलगा शेतात दिसत नाही असे लक्षात आले शोध घेतले असता जवळच्या शेतात मुलगा मृत अवस्थेत आढळून आला.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी डीवायएसपी अनिल माने,पोलीस निरीक्षक हेमंत पाटील,पीएसआय सोनवणे,पोहेकॉ गुलाब ठाकरे,पोलीस नाईक अनिल शिरसाट,ललित पाटील,दिनेश माळी, रवींद्र ईशी,सनी सरदार, बापूजी पाटील,अमित जाधव,पाटील,उमेश पाटील,स्वप्नील बांगर आदींनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात ठेवली.

फॉरेन्सिक पथक घटनास्थळी

घटनेचे गांभीर्य पाहता घटनास्थळी फॉरेन्सिक पथक,स्वान पथक, सायबर क्राईम,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, आदी पथकाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्रीच धाव घेत सर्व शक्यता तपासुन घेत नमुने घेण्यात आले.

मोहितची हत्या का व कुणी केली याचा शोध पोलीस पथकातर्फे घेतला जात आहे.या घटनेचा पुढील अधिक तपास शिरपूर शहर पोलीस करीत आहेत.