Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याबिबट्याच्या हल्ल्यात सहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

बिबट्याच्या हल्ल्यात सहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालूक्यात असलेल्या पिंपळगाव मोर येथे दोन बालकांच्यासोबत शौचाला बसलेल्या एका मुलीला बिबट्याने जंगलाच्या दिशेने ओढत नेल्याची हृदयद्रावक घटना काल (दि १९) रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली होती. दरम्यान, या मुलीचा मृतदेह आज सकाळी जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला…

- Advertisement -

अधिक माहिती अशी की, कविता आंनद मधे (वय 6) काल (दि १९) सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास दोन बालकांसह शौचास बसली होती.

यादरम्यान अचानक बिबटयाने हल्ला करून जंगलाच्या दिशेने कविताला ओढत नेले. हा संपूर्ण प्रकार मुलीचे आजोबा अमृता ढवळू गागड यांच्यासमोर घडला. त्यांनी आरडा-ओरडा केल्याने बिबट्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.

घटनेची माहिती समजताच इगतपुरी वन क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांसोबत परिसर पिंजून काढला. मात्र, अंधार असल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली होती.

दरम्यान, आज पहाटेपासून पुन्हा शोधमोहीम सुरु करण्यात आली. राखीव वन कं क्रं 298 यात सकाळी सव्वाआठ वाजेच्या सुमारास मुलीचे शीर व हात मिळून आले तसेच त्यापुढे. 300 मी अंतरावर मुलीचे धड मिळून आल्याची माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांनी दिली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले.

पश्चिम भाग वनविभाग यांची रेस्क्यू टीम बोलावून घटनास्थळाजवळ आजूबाजूस तीन ते चार पिंजरे व ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच रेस्क्यू टीम पथकाने संपूर्ण बिबट प्रवण क्षेत्रात गस्त घातल्याची माहिती वनविभागाने दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या