Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यासिलेंडरच्या स्फोटात सहा कामगार जखमी

सिलेंडरच्या स्फोटात सहा कामगार जखमी

पंचवटी | panchavati

पेठरोड (Pethroad), कुमावतनगर (Kumavatnagar) येथे आज सकाळच्या सुमारास गॅस गळती होऊन सिलेंडरचा स्फोट (Cylinder blast) झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात एकाच घरातील ६ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत…

- Advertisement -

सर्व जखमी परराज्यातील असून मोलमजुरीनिमित्त गत १० ते १५ वर्षांपासून नाशिकमध्ये (Nashik) स्थायिक झाले आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पेठरोड, कुमावतनगर येथे साडेसहा ते पावणे सातच्या सुमारास टाइल्सची कामे करणाऱ्या कामगारांच्या रूममध्ये गॅस गळती झाल्याने गॅसचा भडका झाला.

काल रात्री घरातील सदस्यांकडून गॅस व्यवस्थित बंद करण्याचे राहून गेले. एकाने सकाळी माचिसने बिडी पेटवली असता गॅसचा भडका होऊन खोलीतील लवलेश धरम पाल (रा.अलादात पूर, जिल्हा उत्तर प्रदेश), अखिलेश धरंपाल (रा. सदर),

विजयपाल फत्तेपूर (उत्तर प्रदेश), संजय मौर्य (रा. अलादात पूर फतेहपुर, उत्तर प्रदेश), अरविंद पाल (रा. इसापूर फतेहपुर, उत्तर प्रदेश), वीरेंद्र कुमार (रा. बारमपूर, फतेहपुर, उत्तर प्रदेश), सर्वांचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे असून हे जखमी झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या