Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यामुंबई-आग्रा महामार्गावर अपघात; सहा अवजड वाहने एकावर एक आदळली

मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात; सहा अवजड वाहने एकावर एक आदळली

नाशिक | प्रतिनिधी

आज पहाटेच्या सुमारास मुंबई आग्रा रस्त्यावर एकावर एक अशी सहा अवजड वाहने आदळल्याने काही काळ याठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, पोलीस आणि अग्निशमन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली…

- Advertisement -

यादरम्यान, अपघातात जीवितहानी झालेली नसली तरीदेखील अग्निशमन दलाच्या बचाव पथकाने वेळीच घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त ट्रकमध्ये अडकून पडलेल्या क्लीनर यांना सुरक्षितरित्या बाहेर काढले.

एकामागून एक वाहने धडकल्याने पुलावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक ठप्प झाल्यामुळे तत्काळ पोलीस यंत्रणा दाखल झाल्यानंतर अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या