Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशआर्मी कॅम्पजवळ दरड कोसळल्याने ६ जवानांचा मृत्यू

आर्मी कॅम्पजवळ दरड कोसळल्याने ६ जवानांचा मृत्यू

नवी दिल्ली । New Delhi

मणिपूर (Manipur) राज्यामध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे (rain) दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यातच नोनी जिल्ह्यातील (Noni district) तुपुल रेल्वे स्थानकाजवळ (Tupul railway station) १०७ प्रादेशिक लष्करी (टेरिटोरियल आर्मी) छावणीवर दरड कोसळल्याने (Landslide) ३० ते ४० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे…

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,आतापर्यंत ६ जवानांचे (army) मृतदेह बाहेर काढण्यात आले असून १३ जवानांना वाचवण्यात यश आले आहे. तसेच काही जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. तर मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह (CM Biren Singh) यांनी याबाबत तातडीची बैठक बोलावली असून जखमींच्या मदतीसाठी डॉक्टरांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.

दरम्यान, जखमींना नोनी आर्मी मेडिकल युनिटमध्ये (Noni Army Medical Unit) उपचारासाठी दाखल करण्यात आले असून दरड कोसळल्याने इझाई नदीच्या (Izai River) प्रवाहावर परिणाम झाला आहे. ही नदी तामेंगलाँग आणि नोनी जिल्ह्यातून (Tamenglong and Noni districts) वाहते. तसेच जिल्हा प्रशासनाने आसपासच्या नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या