रस्त्यावर उभ्या टेम्पोला ट्रकची धडक; सहा जणांचा मृत्यू, १० जखमी

रस्त्यावर उभ्या टेम्पोला ट्रकची धडक; सहा जणांचा मृत्यू, १० जखमी

नवी दिल्ली । New Delhi

आंध्रप्रदेशातील (Aandhra Pradesh) पलनाडू (Palnadu) जिल्ह्यात एका टेम्पोला ट्रकने (Truck-Tempo Accident) धडक दिली आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, पलनाडू जिल्ह्यात (Palnadu District) रस्त्याच्या कडेला एक टेम्पो उभा होता. या टेम्पोला ट्रकने धडक दिल्याने यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

तर १० जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नरसरावपेट येथील गुरजाला सरकारी रुग्णालयात (Gurjala Government Hospital) दाखल करण्यात आले आहे.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत बचावकार्याला सुरुवात केली. याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com