Thursday, April 25, 2024
Homeजळगावसमृद्धी महामार्गावर भीषण अपघातात छत्रपती संभाजीनगर येथील सहा जण ठार ; सहा...

समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात छत्रपती संभाजीनगर येथील सहा जण ठार ; सहा गंभीर

बुलढाणा   Buldhana प्रतिनिधी

 छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथून शेगावला दर्शनासाठी जाणाऱी भरधाव आर्टिगा गाडी (Artiga car) मेहकर नजीक समृद्धी महामार्गावर (Samriddhi Highway) अपघात ग्रस्त (accident) होऊन या अपघातात सहा जण ठार (killed) तर सहा जण गंभीर जखमी (wounded) झाले आहे. हि घटना दुसरबीड टोल नाक्यापासून ५ कि.मी अंतरावर चॅनेल नंबर २९९.६ वर आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. 

- Advertisement -

    छत्रपती संभाजीनगर येथील एन ११ हडको, द्वारकानगर मधील सुरेश भरत बर्वे हे आपल्या आर्टिगा क्रमांक एम.एच.२०,एफ.यु.८९६२ ने स्वतःचा परिवार व मावसभावाच्या परिवारासह शेगावला दर्शनासाठी आज पहाटे ६ वाजता छत्रपती संभाजीनगर येथून निघाले होते. मेहकर नजीक शिवणीपिसा जवळ भरधाव वेगाने जाणारी आर्टिगा गाडी छोट्या पुलावरील खचक्यावरुन उडाली.

या वाहनाने जवळपास चार वेळा पलटी मारली. या भीषण अपघातात हौसाबाई भरत बर्वे (वय ६५),श्रद्धा सुरेश बर्वे (वय ३०),जान्हवी सुरेश बर्वे ( वय ६),किरण राजेंद्र बोरुडे (वय ,३०),भाग्यश्री किरण बोरुडे (वय २१),प्रमिला राजेंद्र बोरुडे (वय ,५२) हे सहा जण जागीच ठार झाले.

तर नम्रता रविंद्र बर्वे ( वय २९),रूद्र रविंद्र बर्वे (वय १२),यश रविंद्र बर्वे ( वय १०),सौम्य रविंद्र बर्वे ( वय ४),अमीत सुरेश बर्वे( वय ३) व चालक सुरेश भरत बर्वे ( वय ३५) हे जखमी झाले असून मेहकर येथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील सिटी केअर रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. चालक सुरेश बर्वे यांची स्वतः ची गाडी असून ते वीज वितरण कंपनीत काम करतात. तर बोरुडे परिवाराचा संभाजीनगर येथे व्यवसाय आहे. 

   सकाळी अंदाजे पावने आठ चे दरम्यान हा अपघात घडताच शिवणीपिसा येथील गणेश पिसे यांनी मेहकर पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांना अपघाताची माहिती दिली. मेहकर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. शिवणीपिसा सरपंच समाधान पिसे, समाधान एकनाथ पिसे, विशाल पिसे, शिवशंकर पिसे, संदीप पिसे, खुशाल वाघ व नागरिकांच्या सहकार्याने पोलिसांनी जखमींना मेहकरला आणले.

दरम्यान मेहकर नायब तहसीलदार अजय पिंपरकर, मंडळ अधिकारी शिवप्रसाद म्हस्के, मेहकरचे कर्मचारी ग्रामीण रूग्णालयात हजर राहिले व मदत केली. तर छत्रपती संभाजीनगर येथून नगरसेवक किशोर नागरे, निलेश चौधरी, स्वप्नील घुगे, अमोल मुळे, अमोल बुगदे,धनंजय मोरे, नितीन नवटाके,शरद पाटील यांनी मेहकर ग्रामीण रूग्णालयात येऊन सर्व प्रेत ताब्यात घेऊन छत्रपती संभाजीनगर येथे घेऊन गेले. दरम्यान ग्रामीण रूग्णालयात येऊन पोलिस अधिक्षक सारंग आवाड,अतिरिक्त पोलीस अधिक्षक बी.महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांनी पाहणी केली व नातेवाईकांना भेटले. मेहकर पोलीस दलाने परिश्रम घेतले.  

शिवणीपिसा जवळील हा दुसरा अपघात असून या आधी सुद्धा १६ जानेवारीला याच ठिकाणी अपघात होउन तीन जण ठार झाले होते. त्यामुळे अपघात स्थळाची अभियंता मार्फत तात्काळ पाहणी होणे आवश्यक आहे. महामार्ग पोलीस यंत्रणा सुद्धा या मार्गावर दक्ष ठेवणे आवश्यक आहे.

दि.१० मार्च रोजी चॅनल नंबर ३१९.९ जवळ कारला अपघात झाला यामध्ये एअरबॅग उघडल्याने चौघे बालंबाल बचावल्याची घटना ताजीच आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या