Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशविजेच्या धक्क्याने सहा जणांचा मृत्यू; १० हून अधिक जखमी

विजेच्या धक्क्याने सहा जणांचा मृत्यू; १० हून अधिक जखमी

नवी दिल्ली | New Delhi

त्रिपुरामधील (Tripura) उनाकोटी (Unakoti) येथे जगन्नाथ रथ यात्रेवेळी (Jagannath Rath Yatra) मोठी दुर्घटना घडली असून रथाचा विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने ६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून मृतांच्या आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे….

- Advertisement -

Rain Update : राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता; नाशिकला कुठला अलर्ट?

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उनाकोटी जिल्ह्यातील कुमारघाट (Kumarghat) येथे भगवान जगन्नाथा यांचा रथ यात्रा उत्सव साजरा केला जात होता. यावेळी भगवान बलभद्र, देवी सुभद्रा आणि भगवान जगन्नाथ यांची रथ यात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली होती. लोखंडाने बनवलेला हा रथ हजारो भाविक (Devotee) आपल्या हाताने खेचत नेत होते.

त्यावेळी लोखंडाचा (Iron) हा रथ रस्त्यातील हाय टेन्शन वायरच्या संपर्कात आल्याने आग रथात उतरली. या विजेच्या प्रवाहामुळे रथात बसलेल्या व्यक्तींना आग लागली. यावेळी रथात बसलेल्यांनी मोठा आरडा ओरडा केला. परंतु, विजेच्या प्रवाहामुळे सहा भाविकांचा जागीच होरपळून मृत्यू (Death) झाला. तर १५ जण जखमी झाले आहेत.

नाशकात हजारो मुस्लिम बांधवांनी अदा केली ‘ईद-उल-अजहा’ची विशेष नमाज

दरम्यान, या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना (Police) कळविली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमन दलास देखील पाचारण केले. त्यानंतर जखमींना बाहेर काढत जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Rain Update : राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता; नाशिकला कुठला अलर्ट?

- Advertisment -

ताज्या बातम्या