डॉ पाटील ठरल्या फर्स्ट फास्टेस्ट लेडी इंडियन; जर्मनीत झाले एकाच वेळी नाशिकचे सहा ‘आयर्न मॅन’

डॉ पाटील ठरल्या फर्स्ट फास्टेस्ट लेडी इंडियन; जर्मनीत झाले एकाच वेळी नाशिकचे सहा ‘आयर्न मॅन’

नाशिक | प्रतिनिधी Nashik

अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पूर्ण करावी लागणारी स्पर्धा म्हणजे ‘आयर्न मॅन’ स्पर्धा (iron man competition) . जर्मनीतील येथील हमबर्ग (hamburg germany) येथे ही स्पर्धा पार पडली. नियमित वेगवेगळ्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या सहा नाशिककरांनी ही स्पर्धा पूर्ण केली. विशेष म्हणजे यामध्ये नाशिकच्या एका महिलेने उल्लेखनीय साहस करत देशातील फास्टेस्ट इंडियन लेडी आयर्नमनचा (Fastest Indian iron man from Nashik) किताब आपल्या नावे केला....

एक-दोन नाही तर तब्बल सहा नाशिककरांनी अतिशय अवघड अशी ही स्पर्धा पार करून नाशिककरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवण्यात यश मिळवले आहे.

नाशिकचे प्रख्यात डॉ वैभव पाटील (Dr Vaibhav Patil) यांनी ही स्पर्धा १४ तास २६ मिनिटांत पूर्ण केली. तर डॉ अरुण गचाले (Dr Arun Gachale) यांनी दुसऱ्यांदा आयर्नमनचा किताब आपल्या नावे केला. त्यांना ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी १५ तास ३७ मिनिटे इतका कालावधी लागला. अरुण पालवे (Arun Palave) यांनी १५ तास ४ मिनिटात ही स्पर्धा पूर्ण केली. तर निलेश झंवर (Nilesh Zavar) यांनी सर्वात आधी ११ तास ५९ मिनिटात या स्पर्धेचा किताब आपल्या नावे केला. तर अनिकेत झंवर (Aniket Zavar) यांनी १४ तास ३५ मिनिटात ही स्पर्ध पूर्ण केली.

विशेष म्हणजे नाशिकच्या या टीममध्ये डॉ देविका पाटील (Dr Devika Patil) यांचाही सहभाग होता. त्यांनी १३ तास ३ मिनिटे वेळ घेत विक्रमी वेळेत ही स्पर्ध पूर्ण करण्याचा बहुमान पटकावला. डॉ पाटील या फास्टेस्ट इंडियन लेडी आयर्नमन झाल्या हेत. याआधी हा विक्रम ब्लॉसम नामक महिलेच्या नवे होता. तर नाशिकमधून आयपीएस अधिकारी डॉ रवींद्र सिंगल (IPS Dr Ravinder Kumar Singal) यांच्या कन्या रविजा सिंगल यांच्यानंतर डॉ देविका पाटील आयर्नमन झाल्या असल्याने महिलांचा या साहसी स्पर्धेकडे कल वाढत चालल्याचे दिसून येत आहे.

नाशिकच्या आयर्नमनच्या यादीत आणखीही दोघांची उपस्थिती होती. यात डॉ सुभाष पवार स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंगमध्ये मागे पडले. विशेष म्हणजे त्यांनी ६५ व्या वर्षी सहभाग नोंदवला होता. नाशिकसाठी ६५ वर्षांच्या व्यक्तीने या साहसी स्पर्धेत सहभाग घेणे हेदेखील विशेष आहे. दुसऱ्या एका महिलेचा या समावेश आहे परंतु त्यांच्याबाबतची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही.

नाशिकमध्ये आतापर्यंत झाले १४ आयर्नमन

जर्मनी येथील हमबर्ग येथे आज झालेल्या आयर्नमन स्पर्धेत सहा आयर्नमन एकट्या नाशिकचे होते. यात एका आर्यनमनने दुसऱ्यांदा या स्पर्धेत मोहोर उमटवली. याआधी अमर मियाजी, आयपीएस अधिकारी डॉ रवींद्रकुमार सिंगल, रविजा सिंगल, चेतन अग्निहोत्री, किशोर घुमरे, प्रशांत डबरी, डॉ अरुण गचाले, महेंद्र छोरीया यांचा समावेश होता. यानंतर आज डॉ वैभव पाटील, डॉ अरुण गचाले, डॉ देविका पाटील, अरुण पालवे, निलेश झंवर, अनिकेत झंवर असे एकूण १४ आयर्नमन नाशिकने दिले आहेत.

अशी होती स्पर्धा

स्पर्धेचा कट ऑफ टाईम १५ तास ५० मिनिटे इतका होता. यामध्ये स्विमिंग ४ किलोमीटर, सायकलिंग १८० किलोमीटर, रनिंग ४२ किलोमीटर होते. हे सर्व स्पर्धकाला १५ तास ५० मिनिटात पूर्ण करावे लागते.

अशी होती आव्हानं

अतिशय खडतर अशी ही स्पर्धा होती. अंधारात स्विमिंग सुरु झाले होते. चार किलोमीटर स्विमिंग करताना कुठे जायचे कुठे यायचे काहीच समजत नव्हते. थंडगार पाणी होते. सायकलिंग करताना प्रचंड हवा होती. त्यात धो-धो पाऊस पडत होता. रस्ते वेडेवाकडे होते. दुसरीकडे रनिंग करत असतानादेखील पावसाची संततधार सुरु होती. पावसात रनिंग करावी लागल्याने मोठय अडचणी आल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com