सहा महिन्यांच्या बाळाने तोंडात टाकला मासा, श्वास अडकल्याने दुर्दैवी अंत

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | Mumbai

अंबरनाथमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. घशात मासा अडकल्याने सहा महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे….

अंबरनाथमधील उलन चाळ परिसरात ही घटना घडली. खेळता खेळता बाळाने तोंडात टाकला मासा, श्वास अडकल्याने बाळाचा तडफडून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

तारक मेहता फेम ‘बबिता’चा अपघात

शहबाज असे या सहा महिन्याच्या बाळाचे नाव आहे. गुरुवारी रात्री शहबाज इतर लहान मुलांसोबत खेळत होता. तेवढ्या खेळता खेळता तो अचानक रडू लागला. त्यामुळे इतर मुलांनी शहबाजच्या पालकांना याची माहिती दिली. शहबाजची आई आणि वडिलांनी शहबाज खेळत असलेल्या ठिकाणी धाव घेतली.

‘डॅडी’बाबत न्यायालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

काही केल्याने शहबाज शांतच होईना. त्यामुळे दोघेही त्याला घेऊन एक खासगी रुग्णालयात दाखल झाले. पण तिथे शहबाजला नेमके काय झाले हेच डॉक्टरांच्या लक्षात आले नाही. त्यानंतर शहबाजच्या आई-वडिलांनी त्याला घेऊन उल्हासनगरचे शासकीय मध्यवर्ती रुग्णालय गाठले. तिथे पोहोचण्यापूर्वीच शहबाज याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *