Nashik Crime News : दोन संशयितांकडून सहा दुचाकी हस्तगत

Nashik Crime News : दोन संशयितांकडून सहा दुचाकी हस्तगत

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

दोन संशयितांकडून (Two Suspects) सहा दुचाकी व एका संशयित युवकाकडून गावठी कट्टा जप्त करण्यास आडगाव गुन्हे शोध पथकास (Adgaon Crime Investigation Team) यश मिळाले आहे .याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात (Adgaon Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

Nashik Crime News : दोन संशयितांकडून सहा दुचाकी हस्तगत
Nashik Onion News : चौथ्या दिवशीही जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद; कोट्यवधींची उलाढाल ठप्प, कांदा व्यापारी भूमिकेवर ठाम

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक शहरातील वाढत्या दुचाकी चोरीच्या (Incidents of bike theft) घटना बघता पोलिस आयुक्त अंकुश शिंदे (CP Ankush Shinde) यांनी गुन्हे उकल करण्याबाबत आदेशित केले आहे. त्यानुसार पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण पंचवटी विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन जाधव यांनी केलेल्या सूचनांनुसार आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्याहदे यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव गुन्हे शोध पथक दुचाकी चोराचा माग काढत होते.

त्यावेळी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, मालेगाव (Malegaon) येथील दोन संशयित हे शहर परिसरातील दुचाकी चोरी करतात. त्यानुसार मालेगाव गाठत संशयित मोबिन मोहम्मद शाबान शकील अहमद अन्सारी (२५) रा.मालेगाव व संशयित जुबेर रेहमान अतिकुर रेहमान पठाण (२०) रा. मालेगाव यांना ताब्यात घेतले. या संशयितांची कसून चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली.

Nashik Crime News : दोन संशयितांकडून सहा दुचाकी हस्तगत
Nashik Dindori News : करंजवण धरण १०० टक्के भरले; धरणातून 'इतक्या' क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु, पाहा Video

यानंतर पोलिसांना आडगाव पोलिस ठाणे हद्दीतील स्वामी समर्थनगर परिसरात दोन युवक गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून संशयित दर्शन उर्फ डोन्या भारत कीर्तने (२२) (रा. नांदूरनाका, आडगाव शिवार) व पियूष अशोक येवले (१९) (रा. राजगड बंगला, अयोध्या नगरी, अमृतधाम) यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून पंचवीस हजार रुपये किमतीचा एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला.

दरम्यान, ही कामगिरी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशान्वये, परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण,पंचवटी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक गणेश न्हायदे, पोलिस उपनिरीक्षक सुभाष जाधव, अशोक पाथरे,भुषण देवरे, सहायक पोलिस उपनिरीक्षक शिंदे, गुन्हे शोध पथकाचे पोलिस हवालदार सुरेश नरवडे, देवराम सुरंजे, ज्ञानेश्वर कहांडळ, अशोक बस्ते, पोलिस नाईक निलेश काटकर, दादासाहेब वाघ, शिवाजी आव्हाड, अरुण अहिरे, पोलीस अंमलदार निखिल वाघचौरे, विलास चारोस्कर, अमोल देशमुख, सचिन बाहेकर, दिनेश गुंबाडे, इरफान शेख, हेमंत आहेर, गणेश देसले यांनी केली.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Nashik Crime News : दोन संशयितांकडून सहा दुचाकी हस्तगत
Accident News Viral Video : भरधाव ट्रकची व्हॅनला धडक; चौघांचा मृत्यू
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com