
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सिन्नर-शिर्डी महामार्गावर (Sinnar Shirdi Highway) एक भीषण अपघात (Accident) घडला आहे. पाथरे गावानजीक हॉटेल वनराई जवळ खासगी आराम बस आणि ट्रकचा अपघात झाला आहे...
अपघात इतका भयंकर होता की दोन्ही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला आहे. यात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला असून ९ जणांची ओळख पटली आहे. अद्याप एका मृताची ओळख पटलेली नाही. आता जखमींची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
जखमींची नावे :
निधी उभळे, माया जाधव, प्रशांत मोहंसी, सिमा नेके, सपना डांगे, हर्षद वाडेकर, धनिषा वाडेकर, शिवण्या बवस्कर, आशा जयस्वाल, योगिता वाडेकर, योगीता वाडेकर, रंजना वोटले, सुप्रिया साहिल, ऋतीका रौंधळ, वषीराणी बेहरा, सुहास बवस्कर.
गंभीर जखमींची नावे :
वर्ष राणी बेहरा (31), योगिता संदेश वाडेकर (३०), मयुरी महेश बाइत (23), श्रुतिका संतोष गोंधळी (42), रंजन प्रभाकर पोटले (४०).
मृतांची नावे पुढीलप्रमाणे.
१) प्रमिला प्रकाश गोंधळी,वय ४५,
२) वैशाली नरेश उबाळे, वय ३२,
३) श्रावणी सुहास बारस्कर, वय ३०,
४) श्रध्दा सुहास बारस्कर, वय ४
५) नरेश मनोहर उबाळे, वय-३८ या सर्व रा. अंबरनाथ
६)बालाजी कृष्णा मोहंती, वय-२५ (ड्रायव्हर)
७) दिक्षा संतोष गोंधळी, वय १८ रा. कल्याण
८)आयुष्मान ऊर्फ साई प्रशांत महंती, वय-५ वर्ष
९) रोशनी राजेश वाडेकर, वय - ३०
उर्वरित एकाची अद्याप ओळख पटलेली नाही.
मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसेच अपघाताची चौकशी करण्याचेदेखील निर्देश त्यांनी दिले आहेत.