Sinnar-Shirdi Highway Accident : दवाखान्यात धाव घेत पालकमंत्र्यांनी केली जखमींची विचारपूस
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सिन्नर-शिर्डी महामार्गावर (Sinnar Shirdi Highway) एक भीषण अपघात (Accident) घडला आहे. पाथरे गावानजीक हॉटेल वनराईजवळ खासगी आराम बस आणि ट्रकचा अपघात झाला आहे.
यात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला असून ३५ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर सिन्नर ग्रामीण रुग्णालयात पालकमंत्री दादा भुसे यांनी सिन्नर ग्रामीण रुग्णालयात जखमींची विचारपूर केली. तसेच मृतांच्या नातेवाईकांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.
याबाबत पालकमंत्री दादा भुसे म्हणाले की, ठाणे अंबरनाथ परिसरातून सदर बस शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येत असताना दुर्दैवी अपघात झाला. १५ बसेस पैकी ५ नंबरच्या बसची आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. यात १० जणांचे निधन झाले. ८ लोकांची नावे जाहीर झाली आहेत. जखमींवर उपचार सुरु आहेत.
या घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. मयतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. जखमींचा सर्व खर्च शासन करणार असून या अपघाताची चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.