सिन्नर कृउबा निवडणूक : कोकाटे, वाजे गटाचा 9-9 जागांवर विजय

सिन्नर कृउबा निवडणूक :  कोकाटे, वाजे गटाचा 9-9 जागांवर विजय
USER

सिन्नर। प्रतिनिधी Sinnar

सिन्नर कृषी उपन्न बाजार समिती निवडणुकीत आ. माणिकराव कोकाटे गटाच्या शेतकरी विकास पॅनलला नऊ जागा, तर माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या जनसेवा पॅनलला 9 जागांवर विजय मिळाला. त्यामुळे सभापती निवड चिठ्ठीपद्धतीने होऊन बाजार समितीतील सत्ताधारी गट स्पष्ट होणार आहे.

विजयी उमेदवारांमध्ये शेतकरी विकास पॅनलच्या सोसायटी गटात भाऊसाहेब खाडे यांना 603 मते मिळून विजय मिळाला. शशिकांत गाडे यांना 601, विनाय घुमरे यांना 589, रविंद्र शिंदे यांना 589, अनिल शेळके यांना 590, सिंदूबाई केशव कोकाटे यांना 623, सुरेखा ज्ञानेश्वर पांगारकर यांना 616, संजय वामन खैरनार 629 मते घेत विजय संपादन केला.

तर वाजे गटाच्या जनसेवा पॅनलला 9 जागा मिळल्या त्यात सोसायटी गटातील जालिंदर जगनाथ थोरात यांना 625 मते मिळाली. शरद ज्ञानदेव थोरात यांना 603 मते मिळाली. तर ग्रामपंचायत गटातून श्रीकृष्ण घुमरे यांना 532 मते मिळाली. रविंद्र पवार 503, गणेश घोलप 547, प्रकाश तुपे यांनी 557 मते मिळवत विजय संपादन केला. तर व्यापारी गटातून सुनील चकोर 95, रविंद्र शेळके 79 मते मिळवून विजयी झाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com