मुख्यमंत्री ठाकरे, मंत्री नारायण राणे १६ वर्षांनी एकाच मंचावर, पण...

मुख्यमंत्री ठाकरे, मंत्री नारायण राणे १६ वर्षांनी एकाच मंचावर, पण...

मुंबई l Mumbai

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते आज सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचा (Sindhudurg chipi airport) लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यासह महाविकास आघाडीतील महत्वाचे मंत्री आणि नेते तसेच भाजप (BJP) नेतेही उपस्थित होते. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले उद्धव ठाकरे आणि नारायण राणे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर येणार असल्याने या कार्यक्रमाकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातली टशन चिपी विमानतळावरही दिसली. यावेळी नारायण राणे आणि अजित पवार यांनी एकाच वेळी एकमेकांना नमस्कार घातला. बाळासाहेब थोरात आणि राणेंनीही एकमेकांना नमस्कार घातला. पण ना उद्धव ठाकरेंनी राणेंकडे बघितलं ना राणेंनी उद्धव ठाकरेंकडे पाहिलं. एकंदरितच तेरे भी चुप-मेरे भी चुप असा प्रसंग उपस्थितांनी अनुभवला.

Related Stories

No stories found.