Tokyo Olympics Live: दोन ऑलिम्पिक पदक जिंकणारी सिंधू पहिली महिला खेळाडू

jalgaon-digital
2 Min Read

टोकियो

टोकियो ऑलिंपिकमध्ये दिमाखात वाटचाल करणाऱ्या पी. व्ही. सिंधूचे (pv sindhu) सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले असले, तरी तिने कांस्यपदक नावावर करत इतिहास रचला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली तसेच दुसरी खेळाडू ठरली आहे. सिंधूने २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते. तसेच ऑलिम्पिकमध्ये सुशील कुमार यांना दोन पदक मिळाली आहे. सुशील कुमारने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 2008 साली ब्रॉन्झ मेडल आणि लंडन ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकलं होतं.

Tokyo Olympics Live: सिंधुकडून देशाला दुसरे पदक, हॉकीत टीम इंडियाची आघाडी

आज रविवारी झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत सिंधूने चीनच्या ही बिंग जिआओचा २१-१३, २१-१५ असा ५३ मिनिटात पाडाव केला. भारतासाठी याआधी मिराबाई चानुने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदकाची कमाई केली होती, त्यात आता सिंधूने भारताच्या झोळीत कांस्यपदक आणून ठेवले. बॉक्सींगमध्ये भारताचे एक पदक निश्चित झाले आहे. बॉक्सींगमध्ये लवलीना बोरगोहेन सेमीफाइनलमध्ये पोहचली आहे.

सिंधूचा प्रवास

सिंधूनं या स्पर्धेतील सुरुवातीच्या 4 मॅचमध्ये आक्रमक खेळ केला होता. सर्व सामने सिंधूनं सरळ गेममध्ये जिंकले होते. सिंधूनं जपानच्या अकाने यामागूचीचा (Akane Yamaguchi) 21-13, 22-20 असा सरळ सेटमध्ये पराभव केला होता. त्यानंतर सेमी फायनलमध्येही सिंधूकडून याच प्रकारच्या खेळाची अपेक्षा होती. मात्र सेमी फायनलमध्ये अनुभवी ताई झू नं तिचा पराभव केला.

ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमधील तिसरे पदक

सायना नेहवाल

कांस्य पदक: लंडन ऑलिम्पिक (2012)

पीवी सिंधू

रौप्य पदक: रियो ऑलिम्पिक (2016)

पीवी सिंधू

कांस्य पदक: टोकियो ऑलिम्पिक (2020)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *