Tokyo Olympics Live: 49 वर्षांनंतर हॉकीत टीम इंडिया सेमीफायनलमध्ये

Tokyo Olympics Live: 49 वर्षांनंतर हॉकीत टीम इंडिया सेमीफायनलमध्ये

पुरुष हॉकीत उपांत्यपुर्व फेरीत भारताने इंग्लडविरुद्ध विजय मिळवला. ब्रिटनविरुद्ध भारत 3-1 ने विजय मिळवला आहे. भारताच्या दिलप्रीतसिंगने 7 व्या मिनिटाला तर गुरजंतसिंगने 16 व्या मिनिटाला गोल केला. हार्दिकसिंगने  57 मिनिटात गोल केला.1972नंतर भारत हॉकीत सेमीफायनलमध्ये पोहचला आहे. सेमीफाइनलमध्ये टीम इंडियाचा सामना बेल्जियमशी होणार आहे.  3ऑगस्ट रोजी हा सामना होणार आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये दिमाखात वाटचाल करणाऱ्या पी. व्ही. सिंधूचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले असले, तरी तिने कांस्यपदक नावावर करत इतिहास रचला आहे. आज रविवारी झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत सिंधूने चीनच्या ही बिंग जिआओचा २१-१३, २१-१५ असा पाडाव केला.

टोकियो टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताची बॅडमिंटन खिळाडू पी.व्ही. सिंधूची कास्य पदकासाठी लढत सुरु आहे. चीनच्या बिंग जियाओविरुद्ध खेळतांना सिंधूने पहिला सेट 21-13 ने जिंकला. दुसऱ्या सेटमध्येही 19-15ने आघाडी घेतली आहे.

पुरुष हॉकीत उपांत्यपुर्व फेरीत भारतीय संघाने आघाडी घेतली आहे. ब्रिटनविरुद्ध भारत २-० ने आघाडीवर आहे. भारताच्या दिलप्रीतसिंगने 7 व्या मिनिटाला तर गुरजंतसिंगने 16 व्य मिनिटाला गोल केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com