ॲड. गुणरत्न सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

ॲड. गुणरत्न सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक (Silve Oak) या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Workers) आंदोलन केलं होतं.

चिथावणीखोर भाषण करुन एसटी कर्मचाऱ्यांची माथी भडकावल्याचा आरोप करत पोलिसांनी ॲड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना अटक केली. याप्रकरणी सदावर्ते गेल्या चार दिवसांपासून पोलीस कोठडीत आहे.

दरम्यान पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे सदावर्तेंना आज सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता सदावर्तेंचा जामीनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसत आहे.

सदावर्तेंना सात दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी पोलिसांनी केली होती. १७ एप्रिलपर्यंत सातारा पोलिसांना न्यायालयाने कारागृहातून गुणरत्न सदावर्तेंचा ताबा घेण्याची परवानगी दिली.

Related Stories

No stories found.