शहरात 'इतक्या' ठिकाणी लागणार सिग्नल यंत्रणा

मुख्य चौक होणार अतिक्रमण मुक्त
शहरात 'इतक्या' ठिकाणी लागणार सिग्नल यंत्रणा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक-औरंगाबाद रस्त्यावरील (Nashik-Aurangabad road) नांदूर नाका परिसरात मिरची चौकात झालेल्या बस अपघातात (bus accident) 14 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर नाशिक शहरातील वाहतुकीचा प्रश्न (issue of transportation) पुन्हा एरणीवर आला असून प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

शहरातील वाहतूक व्यवस्था (Transport system) सुरळीत व सुरक्षित करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी या घटनेची गंभीर दखल घेत प्रशासनाला उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार नियोजन देखील सुरू झाले आहे. दरम्यान वाहतूक सुरक्षित व सुरळीत व्हावी, यासाठी शहरात नव्याने सुमारे 7 ठिकाणी सिग्नल यंत्रणा (traffic signal) उभारण्यात येणार आहे तर ज्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बंद आहे तेथील दुरुस्ती महापालिकेच्या वतीने होणार आहे. यासाठी सुमारे 30 लाख रुपये मनपा खर्च करणार आहे.

ब्लॅकस्पॉटच्या मुद्द्यात सिग्नल नादुरुस्त असणे हा मुद्दा समोर आला आहे. शहरात एकूण 47 सिग्नल असून, त्यात आता नव्याने सात सिग्नलची भर पडणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या सिग्नलपैकी चार सिग्नलवर स्मार्टसिटी कंपनीमार्फत (Smart City Company) व्यवस्थापन केले जाते. महापालिकेमार्फत (Municipal Corporation) 43 सिग्नलचे व्यवस्थापन केले जाते. महापालिकेमार्फत सुरू असलेल्या सिग्नल अनेक बंद पडत असल्याने वाहतूक यंत्रणा ठप्प होते. मिर्ची हॉटेल चौकातील बस दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर संपुर्ण शहरातील विविध अपघातस्थळांचे सर्व्हेक्षण आणि ठोस उपाययोजना करण्यात येणार आहे. या पार्शवभूमीवर नुकतीच रस्ते सुरक्षा समितीची (Road Safety Committee) बैठक झाली आहे.

असे असेल नियोजन

त्वरीत करण्याची कामे आणि दिर्घकालीन उपाययोजना करण्यात येणार आहे, मुंबई नाका चौकातील सर्कलची व्याप्ती कमी होऊ शकते, दृश्यमानता महत्वाची असल्याने चौकातील सुचना फलक त्यांचे ठिकाण, रंग, डिझाईन मध्ये आवश्यक बदल होणार आहे. विविध ठिकाणी वाहतूक नियोजन (Traffic Planning) व पेट्रोलींगच्या दृष्टीने पोलिस चौक्यांची ठिकाणे, डिझाईन, मिर्ची चौकातील टेम्पलेट याबाबत तज्ञांच्या अहवालानुसार नियोजन करण्यात येणार आहे.

जानेवारी ते सप्टेंबर 2022 पर्यंतच्या अपघातांची आकडेवारी नुसार वेगात वाहन चालविण्याचे 186 अपघात झाले असून 60 जणांचा मृत्यू झाला आहे. तर विना हेल्मेटचे 85 अपघात झाले असून 48 जणांचा मृत्यू झाला आहे. 30 चा स्पिड असेल तर 10 टक्के मृत्यूचे प्रमाण असते मात्र स्पिड 60 असेल तर 95 टक्के मृत्यूचे प्रमाण असते, त्याचप्रमाणे विनाहेल्मेट अपघातामुळे देखील मृत्युचे प्रमाण जास्त असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे दृष्यमानता वाढविण्यासाठी हायमास्ट, बंम्प, कॅट आय लावण्यात येणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com