सिद्धू मूसेवालाच्या हत्या प्रकरणातील आरोपीला परदेशातून अटक

सिद्धू मूसेवालाच्या हत्या प्रकरणातील आरोपीला परदेशातून अटक

दिल्ली | Delhi

सिद्धू मूसे वाला हत्याकांड (Sidhu Moose Wala Murder) प्रकरणात आरोपी सचिन बिश्नोईला (Sachin Bishnoi) अजरबैजान येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

लॉरेन्स गँगला सचिन बिश्नोई हा बाहेरून आदेश, सूचना देत होता. मूसेवाला खून प्रकरणात मानसा पोलिसांनी शुक्रवारी आरोपपत्र दाखल केले होते. १८५० पानांच्या आरोपपत्रात २४ आरोपींच्या नावांचा समावेश आहे. यापैकी २० जणांना अटक करण्यात आली आहे.

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची 29 मे रोजी मानसात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. याची जबाबदारी लॉरेन्स गँगचा कॅनडातील म्होरक्या गोल्डी बरार याने घेतली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com