सिद्धार्थ शुक्लाच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून मिळाली ही माहिती

सिद्धार्थ शुक्लाच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून मिळाली ही माहिती

मुंबई:

बिग बॉस फेम सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth Shukla) निधनानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. सिद्धार्थच्या मृत्यूबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सिद्धार्थ शुक्लाचा पोस्टमार्टम रिपोर्ट (post mortem report)आता समोर आला आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये अद्याप डॉक्टरांनी कोणतंही मत नोंदवलेलं नाही. मात्र सिद्धार्थच्या शरीरावर जखमेच्या कोणत्याही खुणा नव्हत्या किंवा अंतर्गत जखमा देखील आढळून नसल्याचे या अहवालात म्हटले आहे. हिस्टोपॅथोलॉजी स्टडी आणि केमिकल अॅनालिसेसद्वारे त्याचा मृत्यूचं नेमकं काय कारण होतं हे तपासलं जाणार आहे. सिद्धार्थचं व्हिसरा देखील सुरक्षित ठेवण्यात आलं आहे. ते देखील तपासले जाणार आहे.

सिद्धार्थ शुक्लाच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून मिळाली ही माहिती
बॉलीवूड अभिनेत्यांच्या बॉडीगार्डचे पगार ऐकून थक्क व्हाल ?

सिद्धार्थ शुक्ला याचं काल (2 सप्टेंबर) रोजी निधन झालं होतं. सिद्धार्थने (sidhart shukla) झोपण्यापूर्वी काही औषधं घेतली होती. पण नंतर तो उठलाच नाही. रूग्णालयात नेलं असता, त्याला मृत घोषित करण्यात आलं. रूग्णालयाने त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्यानं झाल्याचं स्पष्ट केलं आहे.

सिद्धार्थ शुक्लाच्या हिस्टोपॅथोलॉजी स्टडी आणि केमिकल अॅनालिसेसद्वारा (Chemical Analysis) त्याचा मृत्यूचं नेमकं काय कारण होतं हे तपासलं जाईल.पोस्टमॉर्टम अहवालात सिद्धार्थच्या शरीरावर जखमेच्या कोणत्याही खुणा नव्हत्या किंवा अंतर्गत जखमा आढळून आलेल्या नसल्याचं नमूद केलं आहे.सिद्धार्थ शुक्ला याचं पोस्टमार्टम करण्याचा जेव्हा निर्णय घेण्यात आला तेव्हा त्यावेळेस डॉक्टरांच्या एका टीमसह पोलिसांची एक टीम देखील पोस्टमार्टम वॉर्डमध्ये उपस्थित होती.

सिद्धार्थ शुक्लाच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून मिळाली ही माहिती
Visual Story : बिग बॉस फेम सिद्धार्थ शुक्लाचा जीवनप्रवास तुम्हाला माहीत आहे का?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com