Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याकर्नाटकचा पेच सुटला! मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या यांची निवड, डीके शिवकुमार यांना 'हे' पद

कर्नाटकचा पेच सुटला! मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या यांची निवड, डीके शिवकुमार यांना ‘हे’ पद

नवी दिल्ली | New Delhi

कर्नाटकात काँग्रेसला (Congress) अभूतपूर्व यश मिळाले असले तरी सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार या दोघांमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू होती. त्यामुळे कर्नाटकचे (Karnataka) नवे मुख्यमंत्री (CM) कोण होणार? याबाबत उत्सुकता लागून राहिली होती. अखेर आता कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटल्याची माहिती समोर आली आहे…

- Advertisement -

Nashik : युवकाची हातोडीने वार करुन हत्या

कॉंग्रेस हायकमांडने मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब केल्याचे बोलले जात असून डीके शिवकुमार यांना (DK Shivakumar) उपमुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय पक्षाने घेतला असल्याची माहिती मिळत आहे. तर अडीच वर्षांनंतर डीके शिवकुमार मुख्यमंत्री होतील, असा फॉर्म्युला काँग्रेसने ठरवल्याचे समजते. तसेच शनिवार (दि.२० मे) रोजी बंगळुरूत (Bangalore) कर्नाटकमधील नवनिर्वाचित सरकारचा शपथविधी सोहळा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Live Updates : कायदेमंत्रीपदावरून किरेन रिजिजू यांना हटवले; आता ‘या’ नेत्याकडे कार्यभार

दरम्यान, आज सायंकाळी ७ वाजता सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. यानंतर काँग्रेस नेते राज्यपालांची (Governor) भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करतील. तत्पूर्वी, मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार या दोन्ही नेत्यांनी बुधवारी (१७ मे) दिल्लीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची काल (बुधवार) स्वतंत्रपणे भेट घेतली होती.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

असे आहे पक्षीय बलाबल

कर्नाटकातील विधानसभेच्या २२४ जागांपैकी काँग्रेसने १३५ जागा जिंकल्या आहेत. तर भाजप ६६, जेडीएसला १९ आणि इतरांना ०४ जागा मिळाल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या