
दिल्ली | Delhi
कर्नाटकात अखेर काँग्रेसचे (Congress) सरकार स्थापन झालं आहे. विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आज सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी दुसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. तर डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियांक गांधी यांनी उपस्थिती लावली.
काँग्रेसकडून मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचं औचित्य साधून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं आहे. काँग्रेसकडून शपथविधी सोहळ्यासाठी देशभरातल्या समविचारी पक्षांच्या नेत्यांना अमंत्रण देण्यात आलं होतं. या सोहळ्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियकां गांधी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, फारूख अब्दुला यांची उपस्थित होती. यानिमित्तानं देशभरातील विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान या शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेसकडून उद्धव ठाकरे यांना देखील आमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र उद्धव ठाकरे हे या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी हजेरी लावली. तसेच मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार, यांच्या शपथ विधीला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी गैरहजर राहिल्याने चर्चांना उधान आलं आहे.
कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रसने भाजपचा दारुण पराभव केला. कर्नाटक विधानसभेवर आपला झेंडा फडकवण्यात काँग्रेसला यश आले. हे काँग्रेसचे सर्वात मोठे यश मानले जात आहे. कर्नाटकात काँग्रेसने भाजपचा पराभव करत 135 जागांवर विजय मिळवला. कर्नाटकच्या जनतेने काँग्रेसला पाठिंबा देत विजय मिळवून दिला. या निवडणुकीत भाजपला फक्त 66 जागांवर समाधान मानावे लागले. तर जेडीएसला फक्त 19 जागांवर विजय मिळवण्यात यश मिळालं.