नाशिक पदवीधर निवडणूक : शुभांगी पाटलांनी बजावला मतदानाचा हक्क

नाशिक पदवीधर निवडणूक : शुभांगी पाटलांनी बजावला मतदानाचा हक्क

नाशिक | Nashik

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी (Nashik Graduate Constituency) आज मतदान (Voting) होत असून सकाळी आठ वाजेपासून मतदानास सुरुवात झाली आहे. यावेळी काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या मतदानासाठी रांगा लागल्या असून निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे...

महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांनी धुळे शहरातील महानगरपालिका शाळा क्रमांक आठ येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी शुभांगी पाटील यांनी खान्देश कुलस्वामिनी श्री एकवीरा देवीचे दर्शन घेतले.

दरम्यान, मतदान झाल्यानंतर पाटील म्हणाल्या की, 'मी पदवीधर असल्याचा गर्व असून आज मतदानाचा हक्क बजावला आहे. माझे अनेक भाऊ, बहिणी पदवीधर आहेत, मी शिकलेली आहे. मी आज मतदानाचा हक्क बजावला. मी घराबाहेर पडले, तुम्ही देखील बाहेर पडा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com