Wednesday, April 24, 2024
Homeनगरविद्यार्थिनीला शिक्षकाने पाठवला अश्लील मेसेज; घरच्यांनी शिकवला चांगलाच धडा, केली यथेच्छ धुलाई

विद्यार्थिनीला शिक्षकाने पाठवला अश्लील मेसेज; घरच्यांनी शिकवला चांगलाच धडा, केली यथेच्छ धुलाई

श्रीरामपूर  (प्रतिनिधी)

श्रीरामपूर येथील परिसरातील अल्पवयीन मुलीने शालेय सहलीसाठी फी संदर्भात वर्ग शिक्षकांशी संपर्क साधत असताना नजरचुकीने जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकास मोबाईलवर मेसेज पडला. या शिक्षकाने उलट या मुलीस अश्‍लील मेसज व पुष्प पाठविला. याबाबतचा जाब विचारण्यास गेलेल्या या मुलीच्या नातेवाईकांनी त्या शिक्षकास चांगलाच चोप दिला.  

- Advertisement -

धुणे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकींचा पाण्यात बुडून मृत्यू, हृदय पिळवटून घटना

शाळेची सहल जाणार असल्याने एका विद्यार्थीनीने सहलीच्या फी बाबत मोबाईलवर मेसेज टाकला. तो चुकून दुसर्‍यास शिक्षकास गेला. संबंधित शिक्षकांनी याबाबत अल्पवयीन मुलीस मोबाईलवर विचारणा केली. त्यावेळी मुलीने नजरचुकीने फी संदर्भात मेसेज पडला याबद्दल सॉरी म्हणून सांगितले. त्यानंतर संबंधित शिक्षकाने या मुलीच्या  मोबाईलवर अश्‍लील भाषेत मेसेज पाठवून गुलाब पुष्प पाठविले. यामुळे संबंधित अल्पवयीन मुलगी घाबरली. तिने ही माहिती घरातील चुलती व आजी यांना दिली. यानंतर नातेवाईक, शालेय विद्यार्थी मित्रमंडळी यांनी संबंधित शिक्षकास शाळेत येऊन बेदम चोप दिला. यानंतर घटनेची माहिती परिसरात वार्‍यासारखी पसरली.

सीरिअल किलर ‘चार्ल्स शोभराज’ अखेर तुरुंगाबाहेर… त्याची गुन्ह्यांची कुंडली वाचून तुम्ही हैराण व्हाल

दरम्यान काही नागरिकांनी घटनेची माहिती श्रीरामपूर शहर पोलीसांना कळविली. यानंतर बीट अंमलदार यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देत संबंधित शिक्षक व अल्पवयीन मुलींचे नातेवाईक यांच्याशी चर्चा केली परंतु मुलगी बाहेरगावी शालेय सहलीसाठी गेल्याने काही माहिती मिळू शकली नाही.

यासंदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसल्याचे सांगण्यात आले. संबंधित शिक्षकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुलीच्या नातेवाईकांनी व नागरिकांनी केली आहे.

विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी

- Advertisment -

ताज्या बातम्या