Saturday, April 27, 2024
HomeनाशिकVideo : श्री शिव महापुराण कथा महोत्सव : पंडित प्रदीप मिश्रा...

Video : श्री शिव महापुराण कथा महोत्सव : पंडित प्रदीप मिश्रा यांचे जल्लोषात स्वागत

मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

शहरातील कॉलेज मैदानावर उद्या शुक्रवार पासून दुपारी दोन ते पाच या वेळेत श्री शिव महापुराण कथा महोत्सवास ( Shri Shiv Mahapuran Katha Mahotsav) प्रारंभ होत आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्यासह सह इतर राज्यातील हजारो भाविक शिव कथा पूर्व संध्येस आज मालेगावी दाखल झाले आहे सुमारे दोन ते अडीच तीन लाख भाविक या कथा महोत्सवास उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे शिव कथेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मालेगाव नगरी शिवमय झाली आहे.

श्री शिव महापुराण कथा महोत्सवासाठी आज सायंकाळी सात वाजता पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांचे मालेगाव शहरात आगमन झाले. मोसम पुलावर हजारो महिला पुरुष भाविकांनी पंडित मिश्रा यांचे अभूततपूर्व जल्लोषात स्वागत केले.यावेळी ओम नम: शिवाय व शिवभजन गात भाविक मिरवणुकीत सामील झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या