श्रीगणेश जयंती विशेष : दर्शन नाशिकच्या अष्टविनायकांचे

श्रीगणेश जयंती विशेष : दर्शन नाशिकच्या अष्टविनायकांचे

नाशिक | प्रतिनिधी Nashik

आज श्रीगणेश जयंती. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला श्रीगणेश जयंती साजरी केली जाते. या चतुर्थीला वरद चतुर्थी किंवा तिळी चतुर्थीदेखील म्हटले जाते. भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात.

माघी गणेश जयंतीनिमित्त दर्शन घेऊया नाशिकमधील अष्टविनायकांचे. सुरुवात करूया आनंदवल्लीपासून. या सर्व मंदिरांमध्ये माघी जयंतीनिमित्त धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवले जातात.

नवश्या गणपती

साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेला पेशवेकालीन गणपती. आजच्या निमित्ताने ब्रह्मगिरीवरून तीर्थ आणून गणेशमूर्तीला अभिषेक केला जातो. आनंदवल्ली ते नवश्या गणपती मंदिर मार्गावर पालखी निघते. हे स्थान आनंदवल्ली येथे आहे.
नवश्या गणपती साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेला पेशवेकालीन गणपती. आजच्या निमित्ताने ब्रह्मगिरीवरून तीर्थ आणून गणेशमूर्तीला अभिषेक केला जातो. आनंदवल्ली ते नवश्या गणपती मंदिर मार्गावर पालखी निघते. हे स्थान आनंदवल्ली येथे आहे.
ढोल्या गणपती

हे मंदिर पुरातन आहे. मूर्ती आकाराने मोठी आहे व स्वयंंभू मानली जाते. हे मंदिर अशोकस्तंभ येथे आहे.
ढोल्या गणपती हे मंदिर पुरातन आहे. मूर्ती आकाराने मोठी आहे व स्वयंंभू मानली जाते. हे मंदिर अशोकस्तंभ येथे आहे.
चांदीचा गणपती
मंदिराला 104 वर्षांची परंपरा लाभली आहे. मूर्ती 251 किलो चांदीची आहे. ट्रस्टतर्फे नाममात्र दरात धर्मार्थ दवाखाना चालवला जातो. हे मंदिर रविवार कारंजा येथे आहे.
चांदीचा गणपती मंदिराला 104 वर्षांची परंपरा लाभली आहे. मूर्ती 251 किलो चांदीची आहे. ट्रस्टतर्फे नाममात्र दरात धर्मार्थ दवाखाना चालवला जातो. हे मंदिर रविवार कारंजा येथे आहे.
दशभुजा गणपती
गणेशमूर्तीची 1623 साली स्थापना झाल्याचे मानले जाते. दशभुजा गणेशाची मूर्ती दुर्मिळ असल्याचे सांंगितले जाते. हे स्थान  गोरेराम लेनमध्ये आहे.
दशभुजा गणपती गणेशमूर्तीची 1623 साली स्थापना झाल्याचे मानले जाते. दशभुजा गणेशाची मूर्ती दुर्मिळ असल्याचे सांंगितले जाते. हे स्थान गोरेराम लेनमध्ये आहे.
मोदकेश्वर गणपती
ग्रामदैवत व स्वयंभू स्थान मानले जाते. गोदावरी महात्म्य, गणेशपुराण आणि गणेशकोषात या स्थानाचे महात्म्य असल्याचे सांगितले जाते. हे स्थान आसराची वेस येथे आहे.
मोदकेश्वर गणपती ग्रामदैवत व स्वयंभू स्थान मानले जाते. गोदावरी महात्म्य, गणेशपुराण आणि गणेशकोषात या स्थानाचे महात्म्य असल्याचे सांगितले जाते. हे स्थान आसराची वेस येथे आहे.
खांदवे गणपती
ही मूर्ती खांदवे कुटुंबियांच्या घरातील आहे. नंतर छोटेखानी मंदिर बांधले गेले. भाविकांच्या सोयीसाठी 40 वर्षांपूर्वी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. हे स्थान सोमवार पेठ येथे आहे.
खांदवे गणपती ही मूर्ती खांदवे कुटुंबियांच्या घरातील आहे. नंतर छोटेखानी मंदिर बांधले गेले. भाविकांच्या सोयीसाठी 40 वर्षांपूर्वी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. हे स्थान सोमवार पेठ येथे आहे.
साक्षी गणपती
ही दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिकृती आहे. ती सोनपितळ धातूंची बनलेली आहे. ही मूर्ती साकारण्यासाठी दगडूशेठ हलवाई ट्रस्टची परवानगी घेतल्याचे  मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले. हे स्थान भद्रकाली मंदिराजवळ आहे.
साक्षी गणपती ही दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिकृती आहे. ती सोनपितळ धातूंची बनलेली आहे. ही मूर्ती साकारण्यासाठी दगडूशेठ हलवाई ट्रस्टची परवानगी घेतल्याचे मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले. हे स्थान भद्रकाली मंदिराजवळ आहे.
मेनरोडचा गणपती
1891 साली मूर्तीची स्थापना झाली. मंदिराला संगीतसेवा आणि कीर्तनसेवेची मोठी परंपरा आहे. हे स्थान मेनरोड येथे आहे.
मेनरोडचा गणपती 1891 साली मूर्तीची स्थापना झाली. मंदिराला संगीतसेवा आणि कीर्तनसेवेची मोठी परंपरा आहे. हे स्थान मेनरोड येथे आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com