Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशराजधानी हादरली! वसईच्या तरुणीची दिल्लीमध्ये निर्घृण हत्या, शरीराचे केले ३५ तुकडे

राजधानी हादरली! वसईच्या तरुणीची दिल्लीमध्ये निर्घृण हत्या, शरीराचे केले ३५ तुकडे

दिल्ली | Delhi

राजधानीत घडलेल्या मुंबईतील तरुणीच्या हत्याकांडामुळे संपूर्ण देश हादरला आहे. श्रद्धा नावाच्या तरुणीची तिच्या लिव्ह इन पार्टनरनेच निर्घृण हत्या केली. तरुणीचा खून करुन तो थांबला नाही, त्याने तिचे ३५ तुकडे केले आणि जंगलामध्ये फेकून दिले.

- Advertisement -

श्रद्धा आणि आफताब अमीन पूनावाला यांच्या नात्याला त्यांच्या कुटुंबीयांनी नकार दिला आणि त्यामुळे दोघेही दिल्लीच्या मेहरौली परिसरात राहण्यासाठी आले. श्रद्धाच्या सर्वात जवळच्या व्यक्तीला तिच्यासोबत असं कृत्य करताना त्याचे हात कसे थरथरले नाहीत, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा आणि आफताब या दोघांची भेट ही मुंबईतील एका कॉल सेंटरमध्ये झाली होती. दोघांमध्ये आधी मैत्री झाली त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले होते. दोघेही प्रेमात आकंठ बुडाले होते. त्यांनी कुटुंबीयांना माहिती दिली. पण, घरच्यांचा विरोध होत असल्यामुळे दोघेही दिल्लीला पळून गेले. दिल्लीमध्ये छतरपुर दोघे एकत्र राहत होते. श्रद्धाचे कुटुंबीय सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची विचारपूस करत होते.

पण, अचानक श्रद्धाचा काही दिवसांपासून संपर्क होत नसल्यामुळे कुटुंबीयांना संशय बळावला. श्रद्धाचे वडील दिल्लीत पोहोचले आणि त्यांनी तिचा शोध घेतला पण काहीच पत्ता लागला नाही. त्यामुळे त्यांनी दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांना सुरुवातीला कोणतीची माहिती मिळाली नाही. पण पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. त्याच एका खबऱ्याकडून माहिती मिळाली आणि आफताबला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

सुरुवातील आफताबने उडवाउडवीची उत्तरं दिली. पण पोलिसांनी खाक्या दाखवताच आफताबने गुन्ह्याची कबुली दिली. दिल्लीत आल्यावर श्रद्धाने लग्न करण्यासाठी तगादा लावला होता. त्यामुळे १८ मे रोजी भांडण होऊन त्याने श्रद्धाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेहाचे अनेक तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्यात आले. यानंतर पोलिसांनी आफताबच्या जबानीवरून खुनाच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस पथक आरोपीच्या जबानीच्या आधारे मृतदेहाचे तुकडे शोधण्याचा प्रयत्न करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या