नार्को टेस्टमध्ये आफताबने केला धक्कादायक खुलासा

नार्को टेस्टमध्ये आफताबने केला धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली | New Delhi

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात (Shraddha Walker Murder Case) रोज नवीन माहिती समोर येत असून आज श्रद्धाच्या हत्येतील आरोपी आफताबची नार्को टेस्ट (Narco Test) करण्यात आली. या नार्को टेस्टनंतर आफताबने श्रद्धाच्या हत्येची कबुली दिली आहे...

दिल्लीतील रोहिणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये (Dr.Babasaheb Ambedkar Hospital) एफएसएलच्या (न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा) तज्ज्ञ पथकाकडून आफताबची आज नार्को टेस्ट करण्यात आली. या नार्कोटेस्टमध्ये आरोपी आफताबने श्रद्धाचा मोबाईल आणि श्रद्धाची जेव्हा हत्या केली, त्यावेळी तिचे कपडे कुठे फेकले, याचे उत्तर दिले. तसेच श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी कोणती शस्त्रे वापरली आणि ती कुठे फेकली, याचा खुलासा केला आहे.

तसेच पोलिसांनी (Police) आफताबने सांगितलेल्या ठिकाणाहून श्रद्धाचा मोबाईल आणि कपडे जप्त केले असून या प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळेल,असे मानले जात आहे. तर आफताबच्या नव्या गर्लफ्रेंडने आपला श्रद्धाच्या हत्येशी किंवा तिच्या तुकड्यांशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com