Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याश्रद्धा वालकर प्रकरणात पोलिसांना मोठे यश

श्रद्धा वालकर प्रकरणात पोलिसांना मोठे यश

नवी दिल्ली | New Delhi

बहुचर्चित श्रद्धा वालकर हत्याकांड (Shraddha Walker Murder Case) तपासात दिल्ली पोलिसांना आरोपी आफताब पुनावालाने (Aftab Poonawala) जंगलात फेकलेल्या हाडांच्या (Bone) रुपात काही तुकडे मिळाले होते. त्यानंतर आता ते तुकडे श्रद्धाचे वडील विकास वालकर यांच्या डीएनएशी मॅच झाल्याने पोलिसांना तपासात मोठे यश आले आहे…

- Advertisement -

दिल्ली पोलिसांनी आफताबला अटक करून केलेल्या चौकशीदरम्यान त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे मेहरौली आणि गुरुग्रामच्या जंगलात (Forest) फेकून दिल्याचे सांगितले होते. यानंतर पोलिसांनी (Police) मेहरौली आणि गुरुग्रामच्या जंगलामध्ये अफताबने नमूद केलेल्या ठिकाणाहून हाडांच्या रूपात मृतदेहाचे (Dead Body)अनेक तुकडे जप्त केले होते. यात पोलिसांना मानवी जबड्याचे हाडही सापडले होते.

त्यानंतर या हाडांचा तपास करण्यासाठी पोलिसांनी हे सर्व तुकडे सीएफएसएल लॅबला पाठवले होते. एवढचं नाही तर डीएनए चाचणीसाठी श्रद्धाच्या वडिलांचेही सॅम्पल घेण्यात आले होते. त्याच डीएनए चाचणीचा अहवाल आता प्राप्त झाला असून हे हाडांचे तुकडे श्रद्धा वालकरचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, मुळची वसई येथील रहिवासी असलेली श्रद्धा वालकर आणि आफताब पुनावाला हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. कुटुंबीयांचा विरोध असल्याने हे दोघेही दिल्लीत (Delhi)स्थायिक झाले होते. मात्र, काही महिन्यानंतर श्रद्धाने आफताबकडे लग्न करण्यासाठी तगादा लावला होता. त्यानंतर आफताबने मे महिन्यात श्रद्धाची हत्या करत तिच्या शरिराचे तुकडे करत दिल्लीतील वेगवेगळ्या परिसरात फेकून दिले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या