Shraddha Murder Case : श्रद्धाची हत्या केल्याची आफताबची कबुली, म्हणाला “जे काही घडले ते…

Shraddha Murder Case : श्रद्धाची हत्या केल्याची आफताबची कबुली, म्हणाला “जे काही घडले ते…

मुंबई | Mumbai

देशाला हादरवणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांड (Shraddha Murder Case) प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला (Aftab Poonawala) यानं न्यायालयासमोर आपला कबुलीनामा दिला आहे. रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केल्याचं आफताबनं न्यायालयात कबुल केलं आहे.

आफताबची कोठडी संपत असल्याने आज दिल्लीमधील साकेत न्यायालयात हजर करण्यात आलं असता, त्याने न्यायाधीशांसमोर आपणच श्रद्धाची हत्या केली असल्याचं मान्य केलं. न्यायालयाने आफताबच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे.

‘आपण रागाच्या भरात कोणताही विचार न करता हत्या केल्याचा’ दावा आफताबने न्यायाधीशांसमोर केला आहे. हत्येला सहा महिने झाले असून, काही गोष्टी आपल्याला आठवत नसल्याने पोलिसांना सांगू शकत नसल्याचंही त्याने म्हटलं आहे. तसंच आपण पोलिसांनी तपासात सहकार्य करत असून, यापुढेही करत राहू असं आश्वासन त्याने दिलं आहे.

सध्या आरोपी आफताब या प्रकरणात नवनव्या गुन्ह्यांची गोष्टींची कबूली देत आहे पण अशात आफताब पोलिसांना कितपत खरं सांगतोय, यावर संशंय घेतला जात आहे. त्यामुळे सुरुवातीला त्याची नार्को टेस्ट केली जाणार असल्याचं बोललं जात होतं पण पोलिसांनी त्या अगोदर पॉलिग्राफ टेस्ट करण्याचं ठरवलं आहे त्यामुळे आता आफताबची पॉलिग्राफ टेस्ट केली जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com