Sunday, April 28, 2024
Homeदेश विदेशShraddha Murder Case : आफताबचा जामीनासाठी न्यायालयात अर्ज, सुनावणी कधी?

Shraddha Murder Case : आफताबचा जामीनासाठी न्यायालयात अर्ज, सुनावणी कधी?

दिल्ली | Delhi

देशभरात श्रद्धा वालकर हत्या प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. दिल्लीच्या श्रद्धा वायकरचा तिचा प्रियकर आफताब पुनावालाने गळा दाबून खून करत ३५ तुकडे करुन त्याने फ्रिजमध्ये ठेवले होते. ज्यानंतर रोज नवनव्या खुलाशाने पोलिसही चक्रावून गेले होते. संपूर्ण देशाला हादरवुन टाकणाऱ्या दिल्लीच्या श्रध्दा वालकर प्रकरणात सध्या एक मोठी अपडेट समोर आली आहे.

- Advertisement -

धक्कादायक! उपवासाची भगर खाल्ल्याने ४०० हून अधिक नागरिकांना विषबाधा

सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आफताबने दिल्लीच्या साकेत न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. त्याच्या जामीन अर्जावर उद्या म्हणजेच १७ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. मात्र आफातबला जामीन मिळणे अशक्य असल्याचं बोललं जात आहे. कारण आफताबने नार्को आणि पॉलिग्राफ टेस्टमध्ये आपला गुन्हा कबूल केला आहे.

भरधाव ट्रकने चिरडले; महिला जागीच ठार, एक गंभीर

तसेच मेहरौलीच्या जंगलातून पोलिसांना सापडलेल्या अवशेषांची डीएनए चाचणी करण्यात आली होती. या चाचणीत जंगलात सापडलेली हाडं, केस आणि रक्त यांचा डीएनए श्रद्धाच्या वडिलांच्या डीएनएशी जुळला आहे. सीएफएसएलच्या अहवालात याची पुष्टी झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या