Sunday, April 28, 2024
Homeदेश विदेशShraddha Murder Case : आफताबच्या 'नार्को टेस्ट'मध्ये धक्कादायक माहिती समोर

Shraddha Murder Case : आफताबच्या ‘नार्को टेस्ट’मध्ये धक्कादायक माहिती समोर

दिल्ली | Delhi

संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा हत्याकांड (Shraddha Walker Murder Case) प्रकरणी एकामागून एक नवीन खुलासे होत आहेत. हत्या करणारा आरोपी आफताब अमीन पूनावालाची (Aftab Poonawalla) क्रूरता पाहून सर्वांनाच हादरवून सोडले आहे. काल (१ नोव्हेंबर) आरोपी आफताबची नार्को टेस्ट झाली. या नार्को चाचणीनंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

या टेस्टमध्ये त्याने डॉक्टरांना आपल्या गुन्ह्याविषयी माहिती दिली आहे. त्याने सांगितलं की जेव्हा श्रद्धाने आपल्याला सोडून जायची धमकी दिली, त्यावेळी त्याने श्रद्धाचा खून केला. आपण श्रद्धाचं शीर लपवून ठेवलं होतं आणि नंतर ते टाकून दिलं, अशी माहितीही आफताबने दिली. मात्र ते कुठे टाकलं हे त्याला आठवलं नाही. आफताबची नार्को टेस्ट जवळपास दोन तास चालली. या दोन तासात आफताबला दिलेल्या केमिकलमुळे तो अनेकदा बेशुद्ध पडत होता. त्याला हलवून, थोपटून जागं करावं लागत होतं. आफताबला २० – २५ प्रश्न विचारले गेले.

दरम्यान, पोलिसांनी आफताबने सांगितलेल्या ठिकाणाहून श्रद्धाचा मोबाईल आणि कपडे जप्त केले तर या प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळेल, असे मानले जात आहे. श्रद्धा वालकर हत्याकांड उघड झाल्यापासून यात रोज काही ना काही अपडेट येत आहेत. आता आफताबची नवी गर्लफ्रेंड समोर आली आहे. आपला श्रद्धाच्या हत्येशी किंवा तिच्या तुकड्यांशी काहीही संबंध नसल्याचा दावा तिने केला आहे. तरुणीने सांगितले की, जेव्हा ती आफताबच्या घरी त्याला भेटायला यायची तेव्हा आफताबने या घरात श्रद्धाचे तुकडे ठेवले होते याची तिला कल्पना नव्हती.

- Advertisment -

ताज्या बातम्या