Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यालोकसभेला निवडून येऊन दाखवा!; संजय राऊत यांचे हेमंत गोडसे यांना खुले आव्हान

लोकसभेला निवडून येऊन दाखवा!; संजय राऊत यांचे हेमंत गोडसे यांना खुले आव्हान

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

शिवसेनेचे (shiv sena) 40 आमदार (MLA) गेले, 13 खासदार (MP) गेले असले तरी शिवसेना (shiv sena) होती तशीच आहे. पालापाचोळा गेला आहे. चिंता करण्याची गरज नाही.

- Advertisement -

थोडासा पालापाचोळा उडाला इतकेच, पण शिवसेना आणि शिवसैनिक (shiv sainik) आपल्या-आपल्या जागी आहेत, असे परखडपणे सांगताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर आसूड ओढले. एवढेच नव्हे तर खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांनी पुन्हा लोकसभेला (Lok Sabha) पुन्हा निवडून येऊन दाखवावे, असे खुले आव्हानच राऊत यांनी दिले.

कारागृहातून जामीनावर बाहेर पडल्यानंतर खासदार राऊत प्रथमच नाशिक (nashik) दौर्‍यावर आले आहेत. आगामी मनपा निवडणुकीच्या (municipal election) पार्श्वभूमीवर राऊत यांचा दौरा महत्त्व मानला जात आहे. शिवसेना पदाधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर आणि बैठका घेतल्यानंतर आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिंदे गटातील मतभेद, शिवसेनेतील फूट, आगामी मनपा निवडणुका (election) आदी अनेक मुद्द्यांवर शाब्दिक फटकेबाजी केली.

सुहास कांदे (suhas kande) आणि दादा भुसे (dada bhuse) यांच्यात खटके उडू लागले आहेत. शिवसेनेतून गद्दारी करुन बाहेर पडलेले 40 आमदार आणि 13 खासदारांंच्या कपाळावर उमटलेला गद्दारीचा शिक्का कायम राहणार आहे, अशी जहरी टीकाही खासदार राऊत यांनी केली. जनमानसात शिवसेनेबद्दल आपुलकीची भावना आहेत. याउलट गद्दारांबद्दल प्रचंड रोष दिसून येत आहे. त्या भीतीपोटी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे राज्य सरकार टाळत आहे, असे सांगून त्यांनी मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

खा.राऊत यांनी शिंदे गटावर चौफेर हल्ला चढवला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी रक्त ओतून निर्माण केलेला पक्ष व त्यांच्या निशाणीला गोठवताना शिवसेनाप्रमुखांच्या नावावर जगणार्‍या गद्दारांंना काहीच कसे वाटले नाही. येत्या निवडणुकीला नवे चिन्ह मशाल घेऊन शिवसेना सामोरी जाणार आहे. जनता शिवसेनेच्या उमेदवारांनाच निवडून देईल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

जत, अक्कलकोटपाठोपाठ आता सुरगाणा देखील परराज्यात ओढण्याचे षडयंत्र रचले जात आहे. मुख्यमंत्र्यांना अशा प्रश्नांचे गांभीर्यच नाही. त्यांना राज्यातील प्रश्नांवर लक्ष द्यायला वेळ नाही. 40 फुटिरांना सांभाळण्याचे काम ते करीत आहेत. स्वाभिमानाच्या मुद्यावर त्यांनी शिवसेना सोडली. आता कुठे गेला त्यांचा स्वाभिमान? दररोज शिवरायांचा अवमान केला जात आहे. त्याचे यांना आता काहीच वाटत नाही का? असा सवालही राऊत यांनी केला.

महाआघाडीसोबतच राज्यात येत्या तीन ते साडेतीन महिन्यांत शिवसेनेचे सरकार सत्तेत येणार आहे, असे भाकितही त्यांनी केले. आघाडीतील प्रत्येकाचे विचार भिन्न आहेत. मात्र आम्ही किमान समान कार्यक्रमावर काम करीत आहोत, असे राऊत यांनी सांगितले. गुजरातमध्ये बाळासाहेबांच्या नावाचा वापर करुन मतांचा जोगवा मागता. बाळासाहेबांनी हिंदुत्वाला खरा आकार दिला आहे. त्यांच्या महाराष्ट्रात मात्र हिंदत्वाचे खरे रक्षक सगळ्यांचे दैवत शिवरायांचा सातत्याने अवमान केला जात आहे. शिवरायांचा अपमान सहन करणारे सरकार सत्तेत आहे, पण शिवसेना ते खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या