Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यारेमडेसिवीरचा तुटवडा; चिंता वाढली

रेमडेसिवीरचा तुटवडा; चिंता वाढली

नाशिक । प्रतिनिधी

मागील तीन दिवसात जिल्ह्याला फक्त ७ हजार रेमडेसिवीरचा इंजेक्शन मिळाले असून त्यापैकी एक हजार इंजेक्शन नंदूरबारला पाठविण्यात आले आहे. करोना संसर्गाचा फैलाव ज्या पद्धतीने होत आहे ते बघता हा रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असून रुग्णांच्या नातेवाईकांना वेटिंग करावी लागत आहे. रेमडेसिवीरचा तुटवड्यामुळे रुग्णालयांसह जिल्हाप्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात रोज चार ते पाच हजार पाॅझिटिव्ह रुग्ण सापडत असून अॅक्टिव रुग्णांची संख्या ४० हजाराच्या घरात पोहचलि आहे. काही रुग्णांची स्थिती गंभीर असून आक्सिजन व व्हेंटीलेटर बेडस मिळवण्यासाठी रुग्णांच्य‍ा नातेवाईकांची धावपळ होत आहे.काही रुग्णांची परिस्थिती अतिशय गंभीर असून रेमडेसिवीर इंजेक्शन मिळविण्यासाठी त्यांना वणवण भटकावे लागत आहे.

रेमडिसिवरचा काळाबाजार टाळण्यासाठी नियंत्रन कक्षाद्वारे त्याचे रुग्णालयांना वितरण केले जात आहे. नाशिककरांसाठी बंगरुळू वरुन ७ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन प्राप्त झाले होते. पण त्यापैकी एक हजार इंजेक्शन नंदूरबारला देण्यात आले. अगोदरच मोठा तुटवडा असताना जिल्ह्याच्या कोट्यातील इंजेक्शन मात्र अद्यापही नाशिकला मिळालेच नाही. त्यामुळे जिल्हाप्रशासनाच्या चिंतेत भर पडली असून रुग्णांच्या नातेवाईकांचा जीव टांगणीला लागला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या