Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रासह राज्यात अवकाळी पाऊस

उत्तर महाराष्ट्रासह राज्यात अवकाळी पाऊस

नाशिक

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत आज अवकाळी पाऊस झाला. हवामान खात्याने राज्यात अनेक ठिकाणी रिमझीम पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला होता.

- Advertisement -

आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. नाशिकमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. सूर्यदर्शन झालेले नाही.नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही भागात पाऊस झाला. तसेच धुळे, नंदुरबारमध्ये अवकाळीने हजेरी लावली. हवेतील गारवा मात्र वाढला आहे. नगर जिल्ह्य्यात ढगाळ वातावरण होते.

गारपिटीची शक्यता

उत्तर महाराष्ट्रात येत्या तीन दिवसांत गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे राज्यात ढगाळ वातावरण असणार आहे, तसे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

मुंबई, पुण्यात पाऊस

मुंबईतील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार आज सकाळपासून वसई तालुक्यात पावसाच्या रिमझिम सरी बरसायला सुरुवात झाल्या. या पावसाने वातावरणात गारवा पसरला असला तरी अनेक व्यावसायिकांचे नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे कोणतीही कल्पना नसताना कामाधंद्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांची सकाळी पावसामुळे तारांबळ उडाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या