प्रतिनिधीक छायाचित्र
प्रतिनिधीक छायाचित्र
मुख्य बातम्या

आजपासून दुकाने सात वाजेपर्यंत खुली राहणार

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

देवळाली कॅम्प |  Deolali Camp

देवळाली शहरात करोना रोगाचा प्रादुर्भाव कमी होत असतांना कॅन्टोनमेंट बोर्डाने शहरातील सर्व दुकाने अनलॉक ३ मध्ये केंद्राच्या निर्देशानुसार आज दि. ६ पासून सर्व दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत उघडी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष भगवान कटारिया यांनी दिली आहे.

देशभरात नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेत केंद्र सरकारने याबाबत दिलेल्या निर्देशानुसार देवळाली कॅन्टोन्मेंट हद्दीतील सर्व दुकाने आजपर्यंत सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येत होती.

त्यानंतर नुकतेच प्राप्त अनलॉक ३ च्या प्रक्रियेनुसार बोर्डाचे सीईओ व घटना व्यस्थापक म्हणून कार्य जाणारे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांनी याबाबत परवानगी दिली आहे.

याबाबत तसेच आमदार सरोज अहिरे यांनी देखील फोनवरून सीईओ यांच्याशी दुकाने सुरु करण्याबाबत सुचविले तसेच सर्व नगरसेवक यांनी ही जनतेच्या वतीने मागणी केली होती. 

गेल्या काही दिवसांपासून कॅन्टोन्मेंट बोर्ड हॉस्पिटल व आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात आलेली प्रभावी कार्यशैली यामुळे रुग्णसंख्या कमी करण्यात यश प्राप्त झाले आहे.

आता पुन्हा सर्व दुकाने पुन्हा ७ वाजेपर्यंत सुरु करण्यात आल्याने व्यावसायिक व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.अंतर सर्वांनी करोनाबाबत हलगर्जीपणा न करता सर्व नियम पाळत सुरक्षित राहावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com