Thursday, April 25, 2024
Homeजळगावभुसावळात गोळीबार दोघे गंभीर

भुसावळात गोळीबार दोघे गंभीर

भुसावळ Bhusawal । प्रतिनिधी

भुसावळ- दीपनगर महामार्गावरील साकरी फाट्याच्या उड्डाण पुलालगत रात्री 10 वाजेच्या सुमारास जुन्या वादातुन (old argument) दुचाकीवर आलेल्या तिघांनी गोळीबार (Shooting) केला. यामध्ये दोन जण जखमी (two serious) झाल्याची घटना घडली असुन त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे भुसावळातील गुन्हेगारीने पुन्हा डोकेवर काढण्यास सुरूवात केल्याने भुसावळ गुन्हेगारीचे माहेरघर असल्याचे समोर आल्याने शहरासह परिसरात भितीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींच्या शोधासाठी दोन पथके रवाना करण्यात आली. या घटनेमागे राजकिय वैमनस्य (Political animosity) व पारिवारिक वादाची (family disputes) पार्श्वभुमी असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

दि.14 एप्रील रोजी भुसावळ शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा जल्लोष सुरु असतांना भुसावळपासुन अवघ्या काही अंतरावर असलेल्या साकरी फाट्याजवळ अक्षय सोनवणे, मंगेश काळे व त्यांचा एक मित्र असे तिघे रात्री 10 वाजेच्या सुमारास जेवणासाठी जात होते. याच दरम्यान उड्डाणपुलालगत तिन जण दुचाकीवर येवुन त्यांनी जुना वाद उकरून काढला व या वादातुन तिघांनी अक्षय रतन सोनवणे (वय 26) व मंगेश अंबादास काळे (वय 24) यांच्यावर गोळीबार केला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत गवळी व पोलीस उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे व पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांनी धाव घेतली. तसेच रुग्णालयात जखमींची भेट घेवून विचारपुस केल्यानंतर तपासाची चक्रे फिरवत आरोपींच्या शोधार्थ पोलीसांची पथके रवाना केली.

हल्लेखोर हे भुसावळच्या खडकारोड भागातील असल्याचे समजते. तसेच पोलीसांनी हल्लेखोरांना लवकरच गजाआड केले जाईल असे सांगितले. असे असले तरी भुसावळातील गुन्हेगारी कमी होत नसल्याचे अनेक घटनांवरून समोर येत असल्याने भुसावळसह परिसरातील नागरिकांमध्ये भितीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे.

भुसावळ गुन्हेगारांचे माहेर घर

भुसावळ शहर हे रेल्वेचे जंक्शन स्थानक असल्याने या शहरात देशभरातील प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. यामुळे रेल्वेतील प्रवाशांचे दागिने, मोबाईल, रोख रक्कम चोरी, अंमली पदार्थांची तस्करी अशा प्रकरणामुळे गुन्हेगारांना पोषक वातावरण निर्माण झाले असून गुन्हेगार खेळण्यातील बंदुकीप्रमाणे गावठी कट्टे सर्रास वापरतांना दिसून येत आहे.

मात्र, अशा अट्टल गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक नसल्याने त्यांचे चांगलेच फावले आहे. यासाठी पोलीसांनी प्रतिबंधात्मक कठोर उपाययोजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याची मागणी नागरीकांमधून होत आहे. दरम्यान जखमी पैकी एकाला सामान्य रूग्णालय जळगाव येथे हलविण्यात आले आहे. तर दुसर्‍यावर गोदावरी रूग्णालयात उपचार सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या