Breaking : लहान भावाने शेतातच पाडला मोठ्या भावाचा मुडदा

मितावली येथील घटना
घटनेचा पंचनामा करतांना पोलिस अधिकारी 
घटनेचा पंचनामा करतांना पोलिस अधिकारी घटनेचा पंचनामा करतांना पोलिस अधिकारी 

धानोरा  Dhanora ता.चोपडा - वार्ताहर

शेतात भेंडी तोडण्यासाठी गेलेल्या मितावली येथील दोन्ही सख्या भावांमध्ये (brothers) वाद होऊन झालेल्या भांडणात (dispute) लहान भावाने (younger brother) धारदार विळ्याने मोठ्या भावाचा (elder brother) शेतातच मुडदा पाडल्याची धक्कादायक घटना पारगाव शिवारात घडली. सख्खा लहान भावानेच मोठ्या भावाचा खून (Murder) केल्याने ‌सख्खा भाऊ पक्का वैरी या म्हणीला तंतोतंत खऱ्या ठरलेल्या. या गंभीर घटनेने संपूर्ण गावासह परिसर हादरला असुन जिल्ह्यात सुरू असलेली खुनांची मालीका थांबत नसल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. 

मीतावली येथील प्रताप मंगा पाटील हे पत्नी, दोन मुलांसह राहतात.त्यांच्याकडे १० एकर स्वतःची शेती आहे.त्यांची दोन्ही मुले एकत्रित शेती करतात.दोघंही विवाहीत आहेत.शनिवारी दोन्ही मुले संदिप पाटील व सतीष पाटील हे पारगाव शिवारात असलेल्या शेतात भेंडी तोडण्यासाठी गेले होते.तेथे त्यांच्यात वाद होऊन भांडण झाले. लहान भाऊ सतिष (वय ३३) याने मोठा भाऊ संदिप (३६)याच्यावर धारदार विळ्याने वार करून शेतातच खून केला. गावापासून शेत दूर असल्याने घटना लवकर उघडकीस आली नाही.

आरोपी मात्र शेतातच थांबून होता.घटनेची वार्ता गावात पोहचताच पो.पा.सोपान पाटील यांनी शेतात येऊन खात्री केली. अडावद पोलिस स्टेशनला माहीती दिली असता एपीआय गणेश बुवा पी.एस.आय.चंद्रकात पाटील स.फौजदार सुनील तायडे, जयदीप राजपूत यांनी घटनास्थळी धाव घेतली. खुनाची घटना असल्याने एपीआय यांनी विभागीय पोलिस अधिकारी ॠषीकेश रावले यांना घटनेची माहिती दिली ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी जळगाव येथून ठसे तज्ञांना पाचारण करून पुरावे ताब्यात घेत घटनेचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी चोपडा येथे पाठवला.

मयत संदिप पाटील
मयत संदिप पाटील

मयत व आरोपी दोन्ही भावांना एक-एक मुलगा व एक- एक मुलगी आहे.आरोपीस पोलीसांनी ताब्यात घेतले असून संख्या भावानेच भावाचा खून का केला याचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.जिल्ह्यात गेल्या आठवड्यात पाचोरा, जामनेर, किनगाव अडावद पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडलेली खुनाची ही चौथी घटना असुन जिल्ह्यात सुरू असलेली खुनाच्या घटनांची मालिका थांबत नसल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.सदर घटनेबाबत अडावद पोलिस स्टेशनला उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com