Friday, April 26, 2024
Homeधुळेधक्कादायक : स्वच्छता निरीक्षक दरमहा घेतात खंडणी

धक्कादायक : स्वच्छता निरीक्षक दरमहा घेतात खंडणी

धुळे । Dhule प्रतिनिधी

महापालिकेत कामचुकार सफाई कामगार हे कामावर येत नाही, अशा कामगारांकडून स्वच्छता निरीक्षक हे दरमहा निम्म्या पगाराची खंडणी घेतात असा आरोप स्थायीच्या सभेत संजय जाधव यांनी केला.या आरोपाची सभापतींनी दखल घेवून सफाई कामगारांची दररोज हजेरी घ्यावी व त्या-त्या प्रभागातील नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात काम करणार्‍या सफाई कामगारांची यादी देण्याबाबत आदेश प्रशासनाला दिलेे.

- Advertisement -

विरोधकांच्या आरोपांकडे लक्ष न देता जनतेच्या विकास हेच ध्येय : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटीलGood News # मध्य रेल्वेतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त 14 विशेष गाड्या धावणार

स्थायी समितीची सभा सभापती शीतल नवले यांच्या अध्यक्षेखाली झाली. सभेत संजय जाधव यांनी आरोग्य विभागाची बायोमेट्रीक पध्दत बंद का झाली? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर माईनकर यांनी सांगितले की, बायोमेट्रिकने सफाई कामगारांना थंब द्यावा लागत होता. परंतु त्याबाबतचे सॉफ्टवेअर यशस्वी झाले नाही, त्यामुळे बायोमेट्रिक पध्दत बंद करण्यात आली. स्वच्छता निरीक्षकच त्यांची हजेरी घेतात.

माईनकर यांच्या उत्तराने संजय जाधव यांचे समाधान झाले नाही. त्यावर निम्मे कामगार कामावरच येत नाही थेट कामगारांकडून स्वच्छता निरीक्षक हे निम्मा पगार घेतात. प्रत्येक निरीक्षकाचे दरमहा 50 हजाराचे टार्गेट असल्याचा आरोपही जाधव यांनी केला.

दरड कोसळलेल्या आमलीबारी-दाब रस्त्याची दुर्दशाचVISUAL STORY : आलिया भट्ट व रणबीर कपूरच्या लेकीचं झालं बारसं

सभापती नवले म्हणाले की, मॅन्युवल हजेरी मुळात नकोच. अगदी सफाई कर्मचारीच नव्हेतर महापालिकेतील स्थिती देखील वेगळी नाही. दुपारी 1 ते 4 यावेळेत कर्मचारी जागेवरच नसतात. आज सकाळी मी 10 वाजता आलो. अनेक विभागात 11 वाजेपर्यंत कर्मचारी नव्हते. हजेरी घेणे हे नगरसेवक, सभापतींचे काम नाही. अशा प्रकारचे काम करुन फोटो सेशन करुन घेण्यात रस नाही, हजेरी घेण्यासाठी एकाची ड्युटी लावा असे सभापतींनी आदेश दिलेे.

VISUAL STORY : हा विवाहित व्यावसायिक विश्वसुंदरी मानुषी छिल्लरला करतोय डेट…आणि आजीमाजी मंत्र्यांसह 18 उमेदवारांचा जीव पडला भांड्यात जिल्हयातील ५४१ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांचे ई-भूमिपूजन

हर्ष रेलन यांनी त्यांच्या प्रभागातील बेपत्ता गटारीचा मुद्दा उपस्थित केला. निविदामध्ये प्रभाग क्र.7 मधील कुमारनगर भागातील धुंडीयाल यांच्या घरापासून चक्कीपर्यंत गटारीचे काम करायचे होते. मात्र येथे गटार झालीच नाही. जर इतर ठिकाणी काम झाले असेल तर त्याची नोेंद एमबी म्हणजेच मोजणी पुस्तकात केली आहे का? टेंडरमध्ये कामाची नोंद एका ठिकाणी आणि काम भलतीकडे असे चालते का? जर तसे करायचे असेल तर टेेंडरचा उपयोगच काय ? असा सवाल केला.

यावर सभापती नवले यांनी सांगितले की, टेंडरमध्ये जरी एखाद्या कामाची नोेंद असली तरी ते काम गैरसोयीचे असेल अथवा त्याची त्या ठिकाणी गरज नसेल तर स्थल निरिक्षक घटनास्थळाची पाहणी करुन त्याच मापाचे काम दुसर्‍या ठिकाणी करु शकतो. म्हणूनच तुमच्याच प्रभागात इतर ठिकाणी हे काम झाले आहे. काम झाले नसेल तर नक्कीच कारवाई होईल याची ग्वाही सभापती नवले यांनी दिली.

VISUAL STORY: होय….मी घटस्फोटासाठी अर्ज दिलाय…..

नागसेन बोरसे यांनी देवपुरातील 30 कोटी रुपयांच्या निधीचा वाद औरंगाबाद खंडपीठात गेल्याचा मुद्दा मांडला. महापालिकेने केलेल्या ठरावा विरोधात धुळ्याच्या आमदारांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. टक्केवारीसाठी ते देवपुरच्या जनतेला वेठीस धरत आहे. म्हणून त्यांच्या निषेधाचा ठराव करावा यावर सभापती नवले म्हणाले की, ठराव बदलण्याचा महापालिकेला अधिकार आहे.

पाठपुरावा करुनही कामे होत नसल्याने नरेश चौधरींची नाराजी

अगदी दोन पथदिव्यांसाठी महिनाभर फेर्‍या माराव्या लागतात. त्यानंतर देखील काम होत नाही, त्यामुळे नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा का? असा प्रश्न उपस्थित करुन देवपुरात चावरा शाळे जवळच्या प्रमुख रस्त्यावर मोठा खड्डा आहे. दुरुस्तीसाठी अनेकवेळा पाठपुरावा केला.उपयोग होत नाही. या रस्त्यावरुन विद्यार्थी वाहतुक देखील होते. मनपा प्रशासनाला आमच्या तक्रारीचे गांभिर्यच नाही. काम करु नका, किमान रस्त्याची पाहणी तर करा, असे चौधरी यांनी प्रशासनाला सुनावले.

किरकोळ कामही होत नाही. त्यामुळे येत्या महिनाभरात काम झाले नाही तर राजीनामा देणार आहे. असा इशारा नरेश चौधरी यांनी दिला. प्रशासनाला मोठे बिले काढायला पैसे आहेत. मात्र छोट्या कामांसाठी पैसे नाहीत असा आरोप चौधरींनी केला. यावर सभापती नवले म्हणाले की, राज्यात आपले सरकार नव्हते, त्यामुळे निधी मिळत नव्हता, आता भरभरुन निधी मिळेल. कामही होतील त्यामुळे तुम्हाला राजीनामा द्यायची गरज नाही असे सभापतींनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या