Monday, April 29, 2024
Homeजळगावधक्कादायक : दर महिन्याला दहिगावात होतोय एका तरुणाचा मृत्यू

धक्कादायक : दर महिन्याला दहिगावात होतोय एका तरुणाचा मृत्यू

यावल Yawal प्रतिनिधी

व्यसनाधीनतेमुळे (addiction) यावल तालुक्यातील दहिगाव (Dahigaon) येथे दर महिन्याला (Every month) एका तरूणाचा (young man) मृत्यू (death) होत असल्याचे धक्कादायक वृत्त (Shocking news) समोर आले आहे. दर महिन्याला व्यसनाधिनतेमुळे एका तरुणाचा मृत्यृ होत असला तरी याकडे समाजासह (society) शासकीय यंत्रणेने (government system) मात्र डोळेझाक (blind eye) केली आहे.

- Advertisement -

 तालुक्यात यावल पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या किनगाव बोरावल गेट यावल, दहिगाव -कोरपावली रस्ता, आडगाव, अट्रावल, अंजाळे यासह इतर गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर गावठी हातपट्टीची पन्नी सर्रास विकली जात आहे. कोरपावली दहिगाव रस्त्यावर संध्याकाळी दारू विक्रेत्यांसह दारुड्यांची जत्रा भरत असून दारूबंदी विभागाने व पोलिसांनी याची दखल घ्यायला हवी. अवैधरित्या विक्री होणार्‍या दारूमुळे दहिगाव गावात दर महिन्याला दारूच्या व्यसनाधीनतेमुळे तरुणांचा मृत्यू होत असल्याची खंत दहिगावच्या एका सुज्ञ नागरिकांने त्याचे नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली.

यावल शहरातील बोरावल गेट भागात दोन-तीन ठिकाणी तर शिवाजी नगरातही एका ठिकाणी व भिलवाडी मध्ये पन्नीतील दारूची सर्रास विक्री होत आहे. कमी पैशात जास्त नशा म्हणून जाोरात विक्री होते. एकीकडे रोजंदारी करून दिवसभर थकून येणारा माणूस हा अर्ध्या पैशांची दारू पितो व घर संसारासाठी नाममात्र पैसे घरी दिल्याने पती-पत्नीचे भांडण होताना दिसत आहेत. यासह १५ ते १८ वय असलेले युवकही यास बळी पडत आहे. शेतात काम केल्यानंतर हे युवक कुसंगतीमुळे किंवा मित्रांच्या आग्रहाखातर पन्नीतील दारू पित असतात.

या गावठी पन्नी दारूमुळे अनेक जण पिवळे पडले असून अनेकांचे मृत्यू यावल तालुक्यात या मुळे झालेले आहेत. मात्र प्रशासनाला जाग येत नाही. तर लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाहीत. अनेकांचे संसार देशोधडीला यामुळे लागलेले आहे.

किनगाव गावात मालोद नायगाव रस्त्यावर सर्रास आठ ते दहा ठिकाणी पन्नी दारू विकली जाते. तर दहिगाव ते कोरपावली रस्त्यावर तसेच स्मशानभूमी जवळ आणि आता तर मेन चौकातही  विकली जाते. कोरपावली दहिगाव रस्त्यावर चार ते पाच ठिकाणी शेतामध्ये दारू विकली जात असल्यामुळे कोरपावली व दहिगाव येथील नशा करणारी मंडळी संध्याकाळी पिण्यासाठी येतात यामुळे रस्त्यावर यात्रेचे स्वरूप दिसते.

अट्रावल अंजाळे या गावांमध्ये तर बिनधास्त दारू विकली जाते. अशा तालुक्यातील मोठमोठ्या गावांमध्ये सर्रासपणे विकली जाते. मात्र भुसावळ विभागाच्या दारूबंदी विभागाची गाडी फक्त ठराविक तारखेलाच येते आणि दारू विक्रेत्यांशी संधान साधून आपले हात ओले करून निघून जात असल्याचा आरोप केला जात आहे.

पन्नी दारूत युरियासह म्हशींचे इंजेक्शन

स्वस्तात मिळत असलेल्या या पन्नी दारूत युरियासह म्हशींना दिल्या जात असलेल्या इंजेक्शनचा वापर केला जात असल्याचे सांगण्यात येते. यामुळे नशा येत असली तरी त्याचा शरीरावर विपरीत परिणाम दिसून येत आहे.

सततच्या पन्नी दारूच्या सेवानामुळे अनेक युवक व विवाहीत युवकांचे शरीर पिवळे पडत आहे. स्वभाव चिडचिड , रागीट होण्यासह त्यांना झटकेही येत असतात. हातपाय जोरात आदळत जमीनीवर लोळत आराडाओरड करत असतात. अशा वेळी घरातील सदस्य त्यांना तात्काळ उपचारासाठी रूग्णालयात दाखल करत असतात. मात्र काही जणांचा रूग्णालयात नेत असतांना तर काहींचा रूग्णालयात उपचार घेत असतांना मृत्यू होत आहे.

चोपड्याकडील व्यसनमुक्ती केंद्रात दाखल

दहिगावातील अनेक विवाहीत व अविवाहीत युवकांना या दारूचे व्यसन लागले आहे. त्यांचे हे व्यसन सुटावे यासाठी पालकांनी त्यांना चोपडा येथील व्यसनमुक्ती केद्रात दाखल करत असतात. मात्र यातुनही काही युवकांना फरक पडत नाही. शरीराला दारूची सवय झालेली असल्याने दारू न मिळाल्यास शरीरावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे व्यसनमुक्ती केंद्रातील उपचारांचा उपयोग होत नाही. अशावेळी व्यसनमुक्ती केंद्र चालक हात वर करून देत असल्याने पालकांना पाल्यास जळगाव. यावल , औरंगाबाद येथे उपचारासाठी रूग्णालयात दाखल करावे लागते. यातील काही जण वेळीच योग्य उपचार मिळाल्याने वाचतात तर काही जणांना प्राणास मुकावे लागते.

समाजाने जागे होण्याची गरज

यावल तालुक्यासह दहिगाव परिसरात युवकांच्या व्यवसनाधिनतेचे प्रमाण जास्त असल्याने याबाबत आता तरी समाजाने जागृत होणे गरजेेचे आहे. आपल्या शेजारी, गावातील युवक व्यसनांमुळे मृत्यूमुखी पडला असला तरी उद्या हे लोण आपल्या घरापर्यतही येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वेळीच समाजाने जागे होत गावात दारू बंदीबाबत आणि युवकांमध्ये जागृती करावी अशी मागणीही होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या