Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याउद्योजकाच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती उघड

उद्योजकाच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती उघड

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पैशाची नितांत गरज असल्याने अपहरण (Kidnapping) करून धमकावून काम मागून काम न दिल्याने खून केल्याची कबुली नाशिकरोड येथील खुनातील (Murder) संशयितांनी पोलिसांना दिल्याचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे (Jayant Naiknavare) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले…

- Advertisement -

यावेळी पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी माहिती दिली की, एकलहरा रोड नाशिकरोड येथील स्वस्तिक फर्निचर कारखान्याचे मालक शिरीष गुलाबराव सोनवणे हे त्यांचे कारखान्यावर बेंच खरेदीची ऑर्डर देण्यासाठी पांढऱ्या रंगावे स्वीफ्ट डिझायर कार मध्ये ( दि.९ ) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आलेल्या तिन अनोळखी व्यक्तींसोबत बसुन गेले ते परत आले नाही म्हणून नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashikroad Police Station) मिसिंगची नोंद केलेली होती.

(दि.१०) सोनावणे यांचे प्रेत मालेगाव तालुका पोलीस ठाणेच्या हददीत सायतरपाडा शिवार ता. मालेगाव जि. नाशिक येथील पाट (कॅनाल) मध्ये मयत अवस्थेत मिळुन आल्याने मालेगाव तालुका पोलीस ठाणेस येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. शवविच्छदन अवहालानंतर वैदयकीय अधिकाऱ्यांच्या अभिप्रायावरून (दि. १२) मालेगाव तालुका पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीण येथे खुनाच्या गुन्हयाची नोंद करून पुढील तपासासाठी गुन्हा नाशिकरोड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.

पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त विजय खरात, सहायक आयुक्त सिध्देश्वर धुमाळ यांनी नाशिकरोड पोलीस ठाणे कडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.

यावरून नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वपोनी अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे,पोलीस निरीक्षक राजु पाचोरकर, सपोनि योगेश पाटील, उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे, अंमलदार अनिल शिंदे, अविनाश देवरे, सुभाष घेगडमल, विशाल पाटील, विष्णु गोसावी, अविनाश जुंद्रे, महेंद्र जाधव, राकेश बोडके, सोमनाथ जाधव, केतन कोकाटे, कुंदन राठोड, विशाल कुंवर, समाधान वाजे आदींच्या पथकाने गुन्हयाचे तपासात तांत्रिक विश्लेषण करून गुन्हयातील संशयितांचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून फुटेज वरून संशयितांचे फोटो तयार करत माध्यमांमध्ये प्रसिद्ध केले होते.

यावरून गोपनिय बातमीदार यांचे कडुन फोटो वरून संशयितांची महिती पोलिसांना मिळाली.त्याआधारे पोलिसांनी संशयित सोमनाथ रामचंद्र कोंडाळकर (३६,व्यवसाय वेल्डिंग दुकान, रा. कालिका माता मंदीराच्या मागे नाशिक) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारणा केली असता खुनामध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेला संशयित प्रविण आनंदा पाटील (२८,रा. घुगे मळा, इच्छामणी गणपती मंदीर, मुळ रा. शिवशक्ती नगर, भडगाव रोड, चाळीसगाव, जि. जळगाव) त्यांच्याकडे पोलिसांनी खुना संदर्भात विचारणा केली असता दोन्ही संशयित हे स्वतः देखील मयत यांचे प्रमाणेच अंबड गाव, नाशिक येथे बेंच व इतर वस्तु बनविण्याचे काम करत होते.

परंतु त्यांना फॅब्रिकेशन व्यवसायातील स्पर्धेमुळे त्यांना मोठ्या ऑर्डर मिळत नव्हत्या. त्या तुलनेत मयत यांचा बँच बनविण्याचा मोठा होलसेल कारखाना असल्याने ते कमी दरात ऑर्डर घेत असल्याने जास्त ऑर्डर त्यांनाच मिळत होत्या, संशयितांना गेल्या ३ महिन्यापासून कोणतीही ऑर्डर न मिळाल्याने ते आर्थिक विवंचनेत होते.

त्यांच्याकडे वर्कशॉपचे व राहत्या घराचे भाडे देणे देखील ४ महिन्यापासून थकित होते. त्यामुळे त्यांना पैशांची नितांत आवश्यकता असल्याने त्यांनी मयत सोनवणे यांना धमकावून त्यांचे कडुन कामाची ऑर्डर घेण्यासाठी त्यांचे अपहरण केले, व सोनवणे यांनी विरोध केल्याने संशयितांनी त्यांना जिवे मारल्याची कबुली दिली. या घटनेत गाडी चालविणाऱ्याला देखील पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास वपोनी अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) गणेश व्हायदे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या