धक्कादायक ! वृक्षासंवर्धनाअभावी ६२ लाख रोपे करपली

मे व ऑक्टोबर महिन्यात अहवालातुन माहिती उघड
 
धक्कादायक ! वृक्षासंवर्धनाअभावी ६२ लाख रोपे करपली

नाशिक | प्रतिनिधी Nashik

जमिनीवरील वनांचे प्रमाण कमी झाल्याने मोठा गाजावाजा करुन राज्यभरात वृक्षारोपण मोहिम राबविण्यात आली. द्ररम्यान नाशिक प्रादेशिक वनवृत्तातील नाशिक व नगर जिल्हयात २०१६ ते २०१९ दरम्यान लागवड केलेल्या वृक्षरोपणापैकी तब्बल ६२ लाख ५८ हजार ७७८ रोपे वृक्षसंवर्धनाअभावी जळाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एवढ्या लाखोंच्या संख्येने रोपे करपल्याने वनविभगाच्य काराभारावर आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

नाशिक आणि नगर या दोन्ही जिल्हयात वनविभागाच्या माध्यमातून २०१६ ते १९ पर्यत २ कोटी ६७ लाख ४४ हजार ६७३ रोपे लावण्यात आली, त्यात सध्याच्या घडीला २ कोटी ४ लाख रोपे संख्या जिवंत असल्याचा दावा वनविभागाने केला आहे. तर तब्बल ६२ हजार ५८ हजार ७७८ रोपे पाण्याअभावी करपल्याचे चित्र आहे. दरम्यान वनविभागाकडून वर्षभरात मे व ऑक्टोंबर या दोन महिन्यात लागवड केलेल्या रोपांची माहिती घेतली जाते, यातूनच किती रोपे जीवंत आहे.याची माहिती समजते.

दरम्यान रोपण केलेल्या रोपांची माहिती वनविभागाकडूनच जमा केली जाते, त्यामुळे यात किती पारदर्शकतेने रोपांचे सर्वेक्षण होते असाही केला जातो. जमिनीवरील वनांचे प्रमाण वाढ्वून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महाराष्ट्रात वन विभाग, सामाजिक वनिकरण, सामाजिक संस्था, शाळा-महाविद्यालये, यांच्या सहभागातून २०१६ पासून वृक्षारोपण मोहिमेस सुरवात झाली.

मात्रू जळालेल्या रोपांचे प्रमाण पाहता रोपांच्या संवर्धनाकडे दूर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. काहीसाठी वृक्षरोपण मोहिम केवळ्फोटोसेशन करण्यासाठीच फार्स असल्याचे दिसून आले आहे. चालु वर्षात प्रादेशिक वन व सामाजिक वनिकरण विभागाकडून नाशिक जिल्हयात ३१ लाखांपर्यत वृक्षरोपण करण्यात येणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com